जयललितांच्या दहा हजार साड्या अन् 28 किलो सोने

वृत्तसंस्था
मंगळवार, 6 डिसेंबर 2016

चेन्नई- तमिळनाडूचे सहा वेळा मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी सांभाळणाऱया जयललिता या राजकारणाशिवाय विविध कारणांमुळे नेहमीच चर्चेत राहिल्या. त्यांना महागड्या साड्या, चपला व सोन्याची आवड होती.

जयललिता या ऐशोरामात जीवन जगल्या. त्यांची जीवनशैली नेहमीच चर्चेत राहिली. महागड्या साड्या, चपला व सोन्याची आवड होती. सन 1996 मध्ये त्यांच्या घरावर आयकर विभागाने छापा टाकला त्यावेळी त्यांच्याकडील वस्तू पाहून अधिकारी आश्चर्यचकित झाले. छाप्यादरम्यान 896 किलो चांदी, 28 किलो सोने व 10 हजारहून अधिक महागड्या साड्या आढळून आल्या. शिवाय, 51 महागडी घड्याळे व 750 चपला मिळाल्या.

जयललिता यांना पाच भाषा अवगत होत्या. यामध्ये इंग्रजी, तमिळ, तेलगू, कन्नड व हिंदी भाषांचा समावेश होता. शिवाय, त्यांना नृत्याचीही आवड होती. भारतातील विविध ठिकाणी त्यांनी आपली कला सादर केली होती. वयाच्या 4 वर्षापासून त्या कर्नाटक संगीत शिकत होत्या. त्यांची भूमिका असलेल्या विविध चित्रपटांमध्ये त्यांनी गाणी गायली होती.

दत्तक घेतलेल्या मुलाचा विवाह असो की चित्रपटातील भूमिका. संपत्ती असो वा सर्वसामान्य नागरिकांशी जवळीक. विविध वृत्तपत्रांमध्ये केलेले लिखान असो वा राजकीय कारकिर्द. परंतु, जयललिता या शेवटपर्यंत चर्चेत राहिल्या.

Web Title: jayalalitha royal life style 28 kg gold with collection of 10,000 sarees