जयललितांच्या समर्थकाचा ह्रदयविकाराने मृत्यू

वृत्तसंस्था
सोमवार, 5 डिसेंबर 2016

चेन्नई- तमिळनाडूच्या मुख्यमंत्री जे. जयललिता यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समजल्यानंतर त्यांच्या एका समर्थकाचा हृदयविकाच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची घटना येथे घडली आहे.

चेन्नई- तमिळनाडूच्या मुख्यमंत्री जे. जयललिता यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समजल्यानंतर त्यांच्या एका समर्थकाचा हृदयविकाच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची घटना येथे घडली आहे.

जयललिता यांना रविवारी (ता. 4) रात्री हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यामुळे त्यांना उपचारासाठी पुन्हा अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांची प्रकृती पुन्हा चिंताजनक झाली असल्याची माहिती राज्यात सर्वत्र समजू लागली. जयललितांबद्दलची माहिती समजल्यानंतर गांधीनगरमध्ये (कडलोर जिल्हा) राहणाऱया अण्णाद्रमुकच्या कार्यकर्त्याची प्रकृती बिघडली. उपचारासाठी त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, उपचारापूर्वीच हृदयविकाराने त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

दरम्यान, जयललिता यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे अपोलो हॉस्पिटलमधील डॉक्‍टरांनी सांगितले आहे. रुग्णालयाबाहेर नागरिकांनी आज (सोमवार) मोठ्या प्रमाणावर गर्दी केली आहे. अनेकांच्या डोळ्यात अश्रू दिसत आहेत. पूजाअर्चाही सुरू झाल्या होत्या. त्या लवकर बऱया व्हाव्यात, यासाठी नेटिझन्स ट्‌विटरवरूनही शुभेच्छा देत आहेत. रुग्णालयाबाहेर जमलेल्या गर्दीवर ताबा मिळविण्यासाठी पोलिसांची जादा कुमक तैनात करण्यात आली आहे. तमिळनाडू सरकारने शाळांना आज सुटी जाहिर केली असून, सुटीचे कारण दिलेले नाही.

Web Title: Jayalalitha's fan Heart attack of death