जयललितांना रुग्णालयातून कधीही सुटी मिळू शकते

वृत्तसंस्था
शनिवार, 12 नोव्हेंबर 2016

चेन्नई- तमिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली असून त्या कधीही घरी जाऊ शकतात, अशी माहिती अपोलो रुग्णालयाचे अध्यक्ष डॉ. प्रताप सी. रेड्डी यांनी दिली.

चेन्नई- तमिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली असून त्या कधीही घरी जाऊ शकतात, अशी माहिती अपोलो रुग्णालयाचे अध्यक्ष डॉ. प्रताप सी. रेड्डी यांनी दिली.

गेल्या दोन महिन्यांपासून जयललिता रुग्णालयात आहेत. डॉ. रेड्डी म्हणाले की, जयललिता यांचा संसर्ग पूर्णपणे नियंत्रणात आला आहे. त्यामुळे त्या केव्हाही रुग्णालयातून सुटी घेऊ शकतात. त्यासाठी कोणताही दिवस निश्‍चित नाही. त्यांना आता थोडेसे खंबीर व्हावे लागेल. हळूहळू त्यांची प्रकृतीत सुधारणा होईल. डॉक्‍टरांचे पथक त्यादृष्टीने काम करत असल्याचेही त्यांनी सांगितले. 68 वर्षीय जयललिता यांना अतिसार आणि तापेमुळे 22 सप्टेंबर रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

Web Title: jaylalita health improve; anytime dicharge