जयललिता कायम प्रेरणा देत राहतील: मोदी

वृत्तसंस्था
मंगळवार, 6 डिसेंबर 2016

नवी दिल्ली - "जयललिता यांच्या निधनामुळे खूप दु:ख झाले आहे. त्यांच्या जाण्याने भारतीय राजकारणाची भरून न निघणारी हानी झाली आहे. त्यांचा नागरिकांशी चांगला संपर्क होता. त्यांना गरिबांच्या कल्याणाची चिंता होती. त्या कायम प्रेरणा देत राहतील', अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जयललिता यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

नवी दिल्ली - "जयललिता यांच्या निधनामुळे खूप दु:ख झाले आहे. त्यांच्या जाण्याने भारतीय राजकारणाची भरून न निघणारी हानी झाली आहे. त्यांचा नागरिकांशी चांगला संपर्क होता. त्यांना गरिबांच्या कल्याणाची चिंता होती. त्या कायम प्रेरणा देत राहतील', अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जयललिता यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

जयललिता यांचे सोमवारी रात्री साडे अकरा वाजता चेन्नईतील अपोलो रुग्णालयात निधन झाले. त्यानंतर देशभर शोककळा पसरली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही एकामागोमाग केलेल्या ट्‌विटरद्वारे शोक व्यक्त केला आहे. "मी जयललिता यांना भेटण्याची संपर्क साधण्याची नेहमी संधी नेहमी असायचो. अशा दु:खद प्रसंगी मी तमिळनाडूच्या जनतेसोबत असून ईश्‍वर सर्वांना हा दु:खद प्रसंग सहन करण्याचे धैर्य देवो. जयललिता यांच्या आत्म्याला शांती लाभो', अशा शब्दांत मोदी यांनी श्रद्धांजली वाहिली आहे. मोदी स्वत: आज (मंगळवार) चेन्नई येथे जयललिता यांच्या अंत्यदर्शनासाठी जाणार आहेत.

देशातील प्रमुख राजकीय पक्षांसह अनेकांनी जयललिता यांना ट्‌विटरद्वारे श्रद्धांजली वाहिली आहे. कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनीही ट्‌विटरद्वारे शोक व्यक्त केले आहे. "आपण आज एक महान नेता गमावला आहे. महिला, शेतकरी, मच्छिमार आणि दुर्लक्षित घटक त्यांच्या डोळ्यात स्वप्न बघायचे. आम्हाला त्यांची कायम आठवण येत राहील', अशा शब्दांत गांधी यांनी शोक व्यक्त केला आहे.

याशिवाय अन्य काही मान्यवरांनी व्यक्त केलेल्या प्रतिक्रिया

जयललितांच्या जाण्याचे खूप दु:ख झाले आहे. त्यांच्या आत्म्याला शांती लाभो.
- सुरेश प्रभू, रेल्वेमंत्री

जयललितांजींनी लोकांसाठी केलेले काम प्रेरणादायी आहे. त्यांच्या आत्म्याला शांती लाभो. तमिळनाडूच्या जनतेप्रती मला सहानुभूती आहे.
- देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री

अम्मांच्या निधन झाल्याचे ऐकून दु:ख झाले. त्या खूप लोकप्रिय नेत्या होत्या. सामान्य माणसांच्या नेत्या होत्या. त्यांच्या आत्म्याला शांती लाभो.
- अरविंद केजरीवाल, मुख्यमंत्री, नवी दिल्ली

Web Title: Jaylalitha will inspires us : Modi