धक्कादायक! कोरोनाबाधित रुग्णाचा मृतदेह नेण्यासाठी जेसीबीचा वापर

वृत्तसंस्था
Saturday, 27 June 2020

कोरोनाच्या भीतीमुळे सर्वकाही...

श्रीकाकुलम : जगभरात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या वाढत आहे. तसेच यातील मृतांची संख्याही मोठी आहे. परंतु, कोरोनाची लागण झाल्याचे समजल्यानंतर अनेकांमध्ये सध्या मोठी भीती निर्माण झाली आहे. असाच प्रकार आंध्र प्रदेशमध्ये पाहिला मिळाला. आंध्र प्रदेशमधील श्रीकाकुलम जिल्ह्यातील पलासा पालिकेच्या कर्मचाऱ्यांचे अमानवी कृत्य समोर आले आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप   

एका 70 वर्षीय वृद्धाला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. त्यावर उपचारही सुरु होते. मात्र, त्याचा यामध्ये मृत्यू झाला. कोरोनामुळे मृत्यू झाल्याचे समजल्यानंतर या वृद्धाचा मृतदेह नेण्यासाठी कोणीही पुढे आले नाही. त्यामुळे हा मृतदेह न्यायचा कसा हा प्रश्न पडला होता. त्यानंतर पलासा पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी चक्क जेसीबीला बोलाविले आणि तो मृतदेह नेण्यास सांगितले. त्यानुसार जेसीबीच्या मदतीने हा मृतदेह उचलण्यात आला आणि नंतर तो मृतदेह अंत्यसंस्कारासाठी नेण्यात आला. या घटनेचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. 

खडबडून प्रशासन जागे

या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पालिका कर्मचाऱ्यांनी केलेला हा प्रकार समोर आला. त्यानंतर श्रीकाकुलम जिल्हा प्रशासन खडबडून जागे झाले. जिल्हाधिकाऱ्यांनी या घटनेची गंभीर दखल घेत पलासा पालिका आयुक्त आणि स्वच्छता निरीक्षकाला तातडीने निलंबित केले. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कोरोनाच्या भीतीने सर्वकाही...

कोरोना व्हायरसचा संसर्ग हा कोरोनाबाधित व्यक्तीच्या संपर्कातून होतो, असे अनेकदा निष्पन्न झाले आहे. त्यानुसार या व्यक्तीला कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे या वृद्धाचा मृतदेह नेल्यास किंवा त्याला हात लावल्यास आपल्यालाही कोरोनाचा संसर्ग होईल, अशी मनात भीती निर्माण झाल्यानेच हा मृतदेह नेण्यास कोणीही पुढे आले नसल्याची प्राथमिक माहिती आहे.

Coronavirus

कोरोनाबाधित रुग्णाचा मृतदेह नेण्यात अडचण

दरम्यान, आंध्र प्रदेशात ही घटना घडली असली तरी देशातील काही भागात अद्यापही काहीशी अशीच परिस्थिती आहे. कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाल्यास त्याचा मृतदेह नेण्यासाठी कोणताही कर्मचारी पुढे येत नाही. काही ठिकाणी तर मृतदेह नेण्यासाठी पैसेही आकारले जात असल्याची अनेक प्रकरणं समोर आली आहेत.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप   


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: JCB Used to take COVID 19 patient Body To Crematorium in Andhra Pradesh