बिहारमध्ये जेडीयू-भाजपमध्ये पुन्हा मतभेद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

JDU-BJP Disagreement again in Bihar

बिहारमध्ये जेडीयू-भाजपमध्ये पुन्हा मतभेद

पाटणा - जेडीयू आणि भाजपचे वादाची आणखी एक ठिणगी पडली. फुलवारीशरीफ भागात पकडलेल्या पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय)च्या संशयित दहशतवाद्यांना पकडल्यानंतर पाटण्याचे वरिष्ठ पोलिस अधीक्षक मानवजितसिंग ढिल्लो यांच्या वक्तव्यावर दोन्ही पक्षांनी वेगवेगळी भूमिका घेतली आहे.

‘पीएफआय’ ही संघटना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाप्रमाणेच काम करते, असे विधान ढिल्लो यांनी दोन दिवसांपूर्वी केले होते. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी भाजपने केली आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार यांचे विश्‍वासू व गृहनिर्माण मंत्री अशोककुमार चौधरी यांनी ढिल्लो यांच्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ घेतल्याचे सांगत त्यांचा बचाव केला. दुसरीकडे भाजपचे नेते सुशीलकुमार मोदी व राज्यसभेचे सदस्य राकेश सिन्हा यांनी ढिल्लो यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

‘जेडीयू’ व भाजपमध्ये सुरू असलेल्या वादावादीत भारतीय कम्युनिस्ट पक्षाने (माले गट) ढिल्लो यांचे समर्थन करीत ते चुकीचे काय बोलले, असा सवाल केला आहे. पक्षाचे नेते. महबूब आलम म्हणाले, की समाजात फूट पाडण्याचे काम ‘आरएसएस’ करते. नितीश कुमार यांचे सरकार दहशतवादाच्या नावाखाली एका विशिष्ट समुदायाला लक्ष्य करीत आहे. ‘

पोलिस अधिकाऱ्यांचा खुलासा

वरिष्ठ पोलिस अधीक्षक मानवजितसिंग ढिल्लो यांनी त्यांच्या विधानाबाबत खुलासा केला. ‘‘संघ ज्या प्रकारे काम करतो, त्याप्रकारचे काम करीत असल्याचे संशयित दहशतवाद्यांनी सांगितले आहे, असा खुलासा ढिल्लो यांनी केला. मी मनाचे काही बोललो नसल्याचे स्पष्टीकरण त्यांनी दिले. या खुलाशानंतरही भाजपने आक्रमक पवित्रा घेतला. संघाबद्दल टिप्पणी केल्याने ढिल्लो यांना माफी दिली जाऊ शकत नाही. त्यांची बदली करायला हवी,’’ अशी मागणी प्रवक्ते अरविंदसिंह यांनी केली.

Web Title: Jdu Bjp Disagreement Again In Bihar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :BiharBjp