esakal | बिहारमध्ये जेडीयू नेत्याची गोळ्या घालून हत्या
sakal

बोलून बातमी शोधा

JDU Leader Ashok Yadav Shot Dead By Bike-Borne Men In Bihar

संयुक्त जनता दलाच्या (जेडीयू) नेत्याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. अशोक यादव (वय,५०) असे त्यांचे नाव असून ते गामहारियाचे शाखाध्यक्ष होते. आपल्या जोगबानी गावाजवळील दुकानाजवळ उभे असताना दुचाकीवरून आलेल्या दोघांनी त्यांच्यावर जवळून गोळ्या झाडल्या. यात गंभीर जखमी झालेल्या यादव यांना सुपाऊल सदर रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

बिहारमध्ये जेडीयू नेत्याची गोळ्या घालून हत्या

sakal_logo
By
टीम ई सकाळ

माधेपूरा (बिहार) : संयुक्त जनता दलाच्या (जेडीयू) नेत्याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. अशोक यादव (वय,५०) असे त्यांचे नाव असून ते गामहारियाचे शाखाध्यक्ष होते. आपल्या जोगबानी गावाजवळील दुकानाजवळ उभे असताना दुचाकीवरून आलेल्या दोघांनी त्यांच्यावर जवळून गोळ्या झाडल्या. यात गंभीर जखमी झालेल्या यादव यांना सुपाऊल सदर रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

ताज्या बातम्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे अॅप

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

बुधवारी रात्री ही घटना घडली आहे. माधेपूराचे पोलिस अधिकारी वसी अहमद यांनी सांगितले की, पोलिसांचा आरोपींना शोधण्यासाठी तपास चालू असून पोलिस लवकरात लवकर आरोपींना पकडतील. दरम्यान, बिहारमधील गुन्हेगारीच्या घटना सातत्याने वाढत असल्याचे दिसून येत आहे. राज्यातील आकड्यांनुसार बिहारीमधील कायदेव्यवस्था ढासळली असल्याचे होत आहे. विरोधी पक्ष सातत्याने यावर टीका करताना दिसत आहेत.

काँग्रेस प्रवक्ते राजेश राठौर यांनी म्हटले आहे की, नीतीश कुमार सरकारमध्ये कायदा आणि व्यवस्था पूर्णपणे ढासळली असून बिहारमध्ये सातत्याने लोकांच्या हत्या होत आहेत. त्यांच्याच पक्षाच्या नेत्याची हत्या होणे हे अतिशय गंभीर असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. त्यांनी म्हटले आहे की, पटना किंवा आणखी दुसऱ्या शहरात भरदिवसा गोळीबार होत आहेत. जर प्रशासकिय यंत्रणा, पोलिस आणि सरकार आपले काम करत असेल तर अशा घटना वारंवार का घडत आहेत? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे. बिहारमध्ये महाजंगलराज चालू असल्याचेही राठौर यांनी म्हटले आहे.