esakal | बिहार विधान परिषदेत ‘जेडीयू’ची एक जागा कमी 
sakal

बोलून बातमी शोधा

बिहार विधान परिषदेत ‘जेडीयू’ची एक जागा कमी 

पाटणा, कोसी, दरभंगा व तिरहाट येथील पदवीधर मतदारसंघाची व पाटणा, तिरहाट, दरभंगा व सरन येथे शिक्षक मतदारसंघासाठी गेल्या महिन्यात निवडणूक झाली होती.मतमोजणीला गुरुवारी (ता.१२) सुरुवात झाली होती.

बिहार विधान परिषदेत ‘जेडीयू’ची एक जागा कमी 

sakal_logo
By
वृत्तसंस्था

पाटणा - बिहार विधान परिषदेच्या आठ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत संयुक्त जनता दल (जेडीयू), भाजप व भारतीय कम्युनिस्ट पक्षा (सीपीआय)ने प्रत्येकी दोन तर काँग्रेस एका जागेवर विजय मिळवला. ‘जेडीयू’ला एका जागेवर अपक्ष उमेदवाराकडून हार पत्करावी लागली. ही माहिती अधिकाऱ्यांनी शनिवारी दिली. 

पाटणा, कोसी, दरभंगा व तिरहाट येथील पदवीधर मतदारसंघाची व पाटणा, तिरहाट, दरभंगा व सरन येथे शिक्षक मतदारसंघासाठी गेल्या महिन्यात निवडणूक झाली होती.मतमोजणीला गुरुवारी (ता.१२) सुरुवात झाली होती. ती काल रात्री उशिरा पूर्ण झाली. मे महिन्यात होणारी ही निवडणूक कोरोनामुळे पुढे ढकलली होती. सर्वेशकुमार या अपक्ष उमेदवाराने दरभंगा पदवीधर मतदारसंघात ‘जेडीयू’च्या उमेदवाराचा पराभव केला. जेडीयू’चे नीरजकुमार व देवेश चंद्र ठाकूर यांनी अनुक्रमे पाटणा व तिरहाट पदवीधर मतदारसंघाची जागा राखली. नीरजकुमार हे नीतिशकुमार यांच्या मंत्रिमंडळात हे मंत्री होते. 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

भाजपचे एन. के. यादव व नवलकिशोर यादव यांनी कोशी पदवीधर व पाटणा शिक्षक मतदारसंघ राखला. सीपीआयचे संजय कुमार सिंग व केदारनाथ पांडे यांनी अनुक्रमे तिरहाट व सरन शिक्षक मतदारसंघातून विजय मिळविला. बिहार प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष मदन मोहन झा यांनी दरभंगा शिक्षक मतदारसंघाची जागा राखली. 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

loading image