'भगव्या जर्सीमुळेच झाला भारताचा पराभव'

वृत्तसंस्था
सोमवार, 1 जुलै 2019

रविवारी इंग्लंड आणि भारत यांच्यात विश्वकरंडक स्पर्धेत झालेल्या सामन्यात भारताला पहिल्यांदा पराभव स्वीकारावा लागला. या सामन्यात भारताचा 31 धावांनी पराभव झाला. ज्यानंतर जम्मू काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री यांनी या पराभवाला भगव्या रंगाची जर्सी कारणीभूत असल्याचे म्हटले आहे.

श्रीनगर : विश्वकरंडकात इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात भारतीय संघ भगव्या रंगाची जर्सी घालून खेळल्याने त्यांना पराभव स्वीकारावा लागला, असा अजब दावा जम्मू काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी केला आहे.

रविवारी इंग्लंड आणि भारत यांच्यात विश्वकरंडक स्पर्धेत झालेल्या सामन्यात भारताला पहिल्यांदा पराभव स्वीकारावा लागला. या सामन्यात भारताचा 31 धावांनी पराभव झाला. ज्यानंतर जम्मू काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री यांनी या पराभवाला भगव्या रंगाची जर्सी कारणीभूत असल्याचे म्हटले आहे.

मुफ्ती यांनी ट्विट करत म्हटले आहे, की मला अंधश्रद्धाळू म्हटलात तरीही हरकत नाही. मात्र भगव्या रंगाच्या जर्सीमुळेच टीम इंडियाला रविवारच्या इंग्लंडविरुद्ध पराभव स्वीकारावा लागला. भारताच्या भगव्या जर्सीवरून यापूर्वीही प्रश्न उपस्थित करण्यात आले होते.

इंग्लंडने दिलेल्या 338 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताचा संघ 306 धावांपर्यंतच मजल मारु शकला. इंग्लंडने 31 धावांनी सामन्यात बाजी मारत, उपांत्य फेरीसाठी आपलं आव्हान जिवंत ठेवले आहे. इंग्लंडचा साखळी फेरीत आता न्यूझीलंडशी सामना होणे बाकी आहे. तर, भारताचा सामना बांगलादेश आणि श्रीलंका यांच्याशी होणार आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Jersey ended India's winning streak says Mehbooba Mufti on World Cup loss