Crime News: धक्कादायक! कारवाईदरम्यान पोलिसांकडून चिरडलं नवजात बाळ; नेमकं काय घडलंय

crime
crimeesakal

झारखंडमधील गिरिडीह जिल्ह्यात बुधवारी छापा टाकण्यासाठी गेलेल्या पोलिसांच्या पायाखाली चिरडून चार दिवसांच्या नवजात बालकाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना गिरडीह जिल्ह्यातील कोसोगोंडोदिघी गावात घडली आहे. पोलिस एका आरोपीच्या शोधात एका घरी गेले होते.

crime
"उद्धवजी पुन्हा विचार करा" भाजप नेत्याकडून उद्धव ठाकरेंना खुली ऑफर? चर्चांना उधाण

यादरम्यान एका खोलीत झोपलेल्या नवजात बाळावर पोलीस कर्मचाऱ्याचा पाय पडला. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, देवरी पोलिस स्टेशनचे प्रभारी संगम पाठक यांच्या नेतृत्वाखालील एक पथक आरोपी भूषण पांडे यांच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी झाल्यानंतर त्याच्या घरी गेले. पोलिसांना पाहताच भूषणच्या कुटुंबातील सर्व सदस्य नवजात मुलाला घरात एकटे सोडून पळून गेले.

crime
Raj Thackeray News: राज ठाकरेंना मुख्यमंत्री करण्यासाठी राष्ट्रवादीच्या नेत्याने सांगितला फार्मुला; चर्चांना उधाण

मृत बालकाच्या आई नेहा देवी यांनी सांगितले की, पोलीस जेव्हा घराची झडती घेत होते तेव्हा तिचे चार दिवसांचे बाळ घरात झोपले होते. पोलिसांचे पथक तपास करून गेल्यानंतर ती घरी आली तेव्हा तिला तिचे मूल मृत अवस्थेत दिसले. मृत नवजात मुलाच्या आईने आणि घरातील इतर सदस्यांनी आरोप केला आहे की पोलिसांनी मुलाला चिरडून ठार केले आहे.

या घटनेची दखल घेत पोलीस उपअधीक्षक संजय राणा म्हणाले की, प्रकरणाचा तपास सुरू असून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. पोस्टमॉर्टम रिपोर्टच्या आधारे कारवाई केली जाईल. या संपूर्ण प्रकरणाची दखल घेत झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी देखील शोक व्यक्त केला. सोबतच या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेशही दिले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com