झारखंडमध्ये भीषण आग! 10 महिला, 3 मुलांसह 14 जणांचा होरपळून मृत्यू : Dhanbad Fire | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Dhanbad Fire

Dhanbad Fire: झारखंडमध्ये भीषण आग! 10 महिला, 3 मुलांसह 14 जणांचा होरपळून मृत्यू

धनबाद : झारखंडमधील धनबाद इथल्या एका रहिवासी इमारतीला भीषण आग लागली आहे. यामध्ये आत्तापर्यंत 10 महिला आणि 3 लहान मुलांसह 14 जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. घटनास्थळी अग्निशमन दल दाखल झालं असून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. (Jharkhand Dhanbad apartment where a massive fire broke out)

धनबादच्या उपजिल्हाधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, एका आशीर्वाद टॉवर नामक आपार्टमेंटला लागलेल्या या आगीत १४ जणांचा होरपळू मृत्यू झाला असून इतर १२ जण जखमी झाले आहेत. या अपार्टमेंटमध्ये एक लग्न समारंभासाठी काही लोकांनी हजेरी लावली होती. यातील अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे.

दरम्यान, आगीच कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. पण सध्या बचाव कार्यावर आम्ही लक्ष केंद्रीत केलं असून जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक संजीव कुमार यांनी सांगितलं.

CM सोरेन यांनी व्यक्त केला शोक

झारखडंचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी या आगीत मृत्यूमुखी पडलेल्या लोकांप्रती शोक व्यक्त केला आहे. सध्या जिल्हा प्रशासन युद्धपातळीवर बचावकार्य करत आहेत. त्याचबरोबर जखमींना उपचारांसाठी प्रयत्न केले जात आहेत, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे.