झारखंडमध्ये नक्षलवादी हल्ल्यात 7 जवान हुतात्मा

वृत्तसंस्था
बुधवार, 27 जून 2018

या हल्ल्यानंतर परिसरात शोधमोहिम राबविण्यात येत आहे. नक्षलवाद्यांविरोधात मोहिम तीव्र करण्यात आली आहे. केंद्रीय राखीव पोलिस दल (सीआरपीएफ), जॅग्वार या नावाने ओळखले जाणारे झारखंड पोलिसांचे विशेष पथक आणि स्थानिक पोलिस यांची मदत घेण्यात येत आहे.  
 
गरवा : झारखंडमधील गरवा जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी घडवून आणलेल्या सुरुंग स्फोटात सात जवान हुतात्मा झाले असून, चार जण जखमी आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गरवा जिल्ह्यातील चिंजाओ भागात जॅग्वार फोर्सला लक्ष्य करून नक्षलवाद्यांकडून स्फोट घडविण्यात आला. नक्षलवाद्यांनी सुरक्षा रक्षकांची गाडी स्फोटात उडविल्यानंतर त्यांच्यावर गोळीबार केला. या हल्ल्यात सात जवान हुतात्मा झाले असून, चार जण जखमी आहेत. जखमी जवानांना हेलिकॉप्टरमधून लाटेहर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

या हल्ल्यानंतर परिसरात शोधमोहिम राबविण्यात येत आहे. नक्षलवाद्यांविरोधात मोहिम तीव्र करण्यात आली आहे. केंद्रीय राखीव पोलिस दल (सीआरपीएफ), जॅग्वार या नावाने ओळखले जाणारे झारखंड पोलिसांचे विशेष पथक आणि स्थानिक पोलिस यांची मदत घेण्यात येत आहे.  
 
Web Title: Jharkhand Maoists trigger landmine blast in Garhwa district kill 7 jawans