जमीन खरेदीत फसवणूक; भाजप खासदाराच्या पत्नीसह 5 जणांवर गुन्हा

टीम ई सकाळ
Wednesday, 20 January 2021

जमीन खरेदीच्या एका प्रकरणात उपायुक्तांच्या न्यायालयाने त्यांच्या पत्नीविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. याशिवाय न्यायालयाने एक करारसुद्धा रद्द केला आहे.

रांची - झारखंडच्या गोड्डा मतदारसंघातील भाजप खासदार निशिकांत दुबे हे अडचणीत येण्याची शक्यता आहे. जमीन खरेदीच्या एका प्रकरणात उपायुक्तांच्या न्यायालयाने त्यांच्या पत्नीविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. याशिवाय न्यायालयाने एक करारसुद्धा रद्द केला आहे. 

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, देवघरमधील एका प्रॉपर्टीशी संबंधित हा करार होता. या प्रकरणात उपायुक्तांच्या न्यायालयाने निर्णय दिला आहे. ऑनलाइन एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेडच्या नावाने करार करण्यात आला होता. या कंपनीचे मालकी हक्क खासदार निशिकांत दुबे यांच्या पत्नीच्या नावावर आहेत. 

हे वाचा - देशात 30 जानेवारीला 2 मिनिटं मौन; केंद्र सरकारचा आदेश

याप्रकरणात असा आरोप करण्यात आला होता की, नोंदणी चुकीच्या प्रकारे करण्यात आली आहे. यात देवघरमधील सब रजिस्ट्रार राहुल चौबे यांने दाखल केले आहे. उपायुक्तांच्या आदेशानंतर निशिकांत दुबे यांच्या पत्नीसह पाच जणांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

हे वाचा - स्वत: संकटात असूनही भारताने निभावला शेजार धर्म; 6 देशांना पाठवतोय कोरोना लस

गुन्ह्यामध्ये अनामिका गौतम यांच्याशिवाय विक्रेता संजीव कुमार, कमल नारायण झाल, देवता पांडे आणि सुमित कुमार सिंह यांची नावे आहेत. पोलिस ठाण्यात या प्रकरणी आरोपींवर कलम 406, 420, 468, 471 आणि 120 बी अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. देवघर जिल्हाधिकाऱ्यांसमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Jharkhand mp wife anamika gautam land deal fraud