झारखंडमध्ये नक्षलवादी हल्ला; 4 पोलिस शहीद 

वृत्तसंस्था
शनिवार, 23 नोव्हेंबर 2019

झारखंडमध्ये काल (ता.22) नक्षलवाद्यांनी मोठा हल्ला घडवून आणला आहे. नक्षलवाद्यांनी लातेहार जिल्ह्यात पोलिसांना लक्ष्य करत हा हल्ला केला. या हल्ल्यामध्ये चार पोलिस शहीद झाले.

नवी दिल्ली - झारखंडमध्ये काल (ता.22) नक्षलवाद्यांनी मोठा हल्ला घडवून आणला आहे. नक्षलवाद्यांनी लातेहार जिल्ह्यात पोलिसांना लक्ष्य करत हा हल्ला केला. या हल्ल्यामध्ये चार पोलिस शहीद झाले. विशेष म्हणजे येत्या 30 नोव्हेंबर रोजी झारखंडमध्ये मतदान होणार आहे. 

ताज्या बातम्यांसाठी सकाळचे एप डाऊनलोड करा 

येथील लातेहार, गडवा, पलामू, गुमला, लोहरदगा आणि चतरा जिल्ह्यातील 13 विधानसभा मतदार संघासाठी मतदान होणार आहे. हे सर्व जिल्हे नक्षल प्रभावित आहेत. या ठिकाणी विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु असताना नक्षलवाद्यांनी मोठा हल्ला घडवून आणला आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री साडेआठच्या सुमारास पोलिसांचे पथक गस्त घालत असताना नक्षलवाद्यांनी त्यांच्या गाडीला लक्ष्य करत हल्ला केला. ही घटना लातेहार जिल्ह्याच्या चंदवा पोलिस ठाण्याच्या हद्दीमध्ये घडली आहे. या हल्ल्यानंतर पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली. मात्र, नक्षलवादी अंधाराचा फायदा घेऊन फरार झाले. नक्षलवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात पोलिस उपनिरिक्षक सुकिया उरांव, कॉन्स्टेबल दिनेश कुमार, कॉन्स्टेबल सिकंदर सिंह, गाडी चालक यमुना राम हे शहीद झाले. या घटनेनंतर झारखंडचे मुख्यमंत्री रघुवर दास यांनी दु:ख व्यक्त केले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: jharkhand naxal attack four Police martyr