झारखंडमध्ये १७ जणांचा महिलेवर बलात्कार;आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल 

पीटीआय
Thursday, 10 December 2020

झारखंडमधील सामूहिक बलात्काराची राष्ट्रीय महिला आयोगाने स्वतःहून दखल घेतली. याप्रकरणी आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांनी झारखंडच्या पोलिस महासंचालकांना पत्र पाठविले आहे. 

रांची - देशात बलात्काराचे सत्र सुरूच असून झारखंडमधील दुमका जिल्ह्यात एका पस्तीसवर्षीय महिलेवर १७ जणांनी सामूहिक बलात्कार केला. पतीला ओलिस ठेवून हे नृशंस कृत्य करण्यात आले. ही महिला पाच मुलांची आई आहे. पोलिसांनी सर्व आरोपींविरुध्द्‌ गुन्हा नोंदविला आहे. दुमकाचे पोलिस अधीक्षक, संथाल विभागाच्या उपमहानिरीक्षकांनी घटनास्थळाला भेट दिली. 

सरकार म्हणतंय, शेतकऱ्यांना लिखित आश्वासन देण्यास तयार, पण...

दुमका जिल्ह्यातील मुफासिल पोलिस ठाण्याच्या हद्दीत मंगळवारी रात्री ही घटना घडली. ही महिला आपल्या पतीसह बाजाराहून परतत होती. त्यावेळी या १७ जणांनी त्यांना थांबविले. पतीला ओलिस ठेवून तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. महिलेची वैद्यकीय तपासणीही करण्यात आली. आपण १७ जणांपैकी केवळ एकाच व्यक्तीला ओळखू शकतो, असे या महिलेने सांगितले. 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

आम्ही या घटनेची कसून चौकशी करत आहोत. संबंधित महिला आपला जबाब बदलत असून गावात चौकशी केल्यावर पाचजणांनी बलात्कार केल्याचे तिने सांगितले, अशी माहिती पोलिस उपमहानिरीक्षक सुदर्शन मंडल यांनी दिली. 

शेतकऱ्यांच्या शंका दूर करू;कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांचे आश्‍वासन 

राष्ट्रीय महिला आयोगाकडून दखल 
झारखंडमधील सामूहिक बलात्काराची राष्ट्रीय महिला आयोगाने स्वतःहून दखल घेतली. याप्रकरणी आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांनी झारखंडच्या पोलिस महासंचालकांना पत्र पाठविले आहे. आयोगाने यासंदर्भात सविस्तर अहवालही मागितला आहे. लैंगिक गुन्ह्याची चौकशी दोन महिन्यांत पूर्ण करण्याच्या केंद्रीय गृह मंत्रालयाच्या मार्गदर्शक तत्वाचे पालन करण्याची सूचनाही आयोगाने झारखंड पोलिसांना केली आहे. 

पुढील वर्षीच्या हजयात्रेसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ 

झारखंडमध्ये बलात्कारांत वाढ 
झारखंडमध्ये यंदा जुलैअखेरीस बलात्काराच्या १,०३३ गुन्ह्यांची नोंद झाली आहे. झारखंड पोलिसांच्या संकेतस्थळावरील या आकडेवारीनुसार यावर्षी बलात्काराच्या २०१९ पेक्षा अधिक घटना घडल्या आहेत. 

कैलाश विजयवर्गीय, मुकुल रॉय जखमी; बुलेटप्रुफ वाहनामुळं वाचलो : जेपी नड्डा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Jharkhand Seventeen people have been booked for allegedly raping