आणखी एका पक्षाने सोडली भाजपची साथ!

jharkhand vidhan sabha election ljp to contest independently bjp
jharkhand vidhan sabha election ljp to contest independently bjp

रांची : महाराष्ट्रात मुख्यमंत्रिपदावरून भाजप-शिवसेनेचा अनेक वर्षांचा संसार मोडला. भाजपचा देशाच्या राजकारणातील सर्वांत मोठा मित्रपक्ष दुरावला आहे. यानंतर आणखी एका पक्षानं भाजपची साथ सोडलीय. 

काय घडले? 
झारखंडची विधानसभा निवडणूक लागली आहे. तिथं प्रत्येक पक्ष उमेदवारांची घोषणा करत असताना, लोक जनशक्ती पक्षानं भाजपसोबत नव्हे तर, स्वतंत्र निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे.  झारखंडच्या विधानसभेत 81 जागा आहेत. त्यापैकी 50 जागांवर स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याची घोषणा लोक जनशक्ती पक्षाकडून करण्यात आली आहे. या पक्षाचे नेते रामविलास पासवान सध्या केंद्रीय मंत्रिमंडळात आहे. 2014च्या निवडणुकीनंतरही पासवान केंद्रीय मंत्रिमंडळात होते. त्यांच्याकडे अन्न व नागरी पुरवठा खात्याची जबाबदारी आहे. केंद्रात मंत्रिपद भूषवित असताना पासवान यांचे चिरंजीव आणि लोक जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष चिराग पासवान यांनी स्वतंत्र निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. त्यामुळं भाजपला विधानसभा निवडणुकीत आणखी एका मित्र पक्षाला गमवावे लागले आहे. 

काय आहे राजकीय परिस्थिती?
सध्या झारखंडमध्ये भाजपची सत्ता आहे. मावळत्या सभागृहात भाजपच्या 37 जागा आहेत. तर ऑल इंडिया झारखंड स्टुडंट्स युनियन आणि झारखंड विकास मोर्चा या तीन पक्षांनी मिळून सत्ता स्थापन केली होती. झारखंड मुक्ती मोर्चाकडे 19 जागा असून, तो प्रमुख विरोधी पक्ष होता. यासह काँग्रेसला सहा बसपला एक तर माकपला एक जागा आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com