ग्रामस्थांच्या मारहाणीत बलात्कार करणाऱयाचा मृत्यू

वृत्तसंस्था
शनिवार, 22 एप्रिल 2017

रांची (झारखंड): एका पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार करणाऱया युवकाला ग्रामस्थांनी बेदम मारहाण केली. यामध्ये तो जागीच ठार झाला आहे, अशी माहिती पोलिसांनी आज (शनिवार) दिली.

रांची (झारखंड): एका पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार करणाऱया युवकाला ग्रामस्थांनी बेदम मारहाण केली. यामध्ये तो जागीच ठार झाला आहे, अशी माहिती पोलिसांनी आज (शनिवार) दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुखसारी गावामध्ये रहात असलेल्या जवाहर लोहार (वय 25) या युवकाने पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार केला होता. यामुळे गावातील नागरिक त्याच्यावर चिडले होते. गावातील नागिरक शुक्रवारी (ता. 21) सकाळी त्याच्या घराबाहेर काठ्या, दगड, चपला घेऊन जमा झाले होते. ग्रामस्थांनी त्याला घराबाहेर ओढून बेदम मारहाण केली. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या जवाहरला उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले. परंतु, रस्त्यातच त्याचा मृत्यू झाला. याबाबत पुढील तपास सुरू आहे.

दरम्यान, याप्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही, असेही पोलिसांनी सांगितले. बलात्कार करणाऱयाला शिक्षा मिळाली असून, पीडित मुलीला न्याय मिळवून दिला आहे, असे ग्रामस्थांनी सांगितले.

Web Title: Jharkhand villager beaten to death for ‘raping’ five-year-old girl