बेहिशेबी मालमत्ताप्रकरणी झारखंडच्या माजी शिक्षणमंत्र्यास अटक

उज्ज्वलकुमार
गुरुवार, 13 डिसेंबर 2018

पाटणा : झारखंडचे माजी शिक्षणमंत्री बंधू तिर्की यांना बेहिशेबी मालमत्ताप्रकरणी आज सीबीआयने अटक केली. त्यांना चौदा दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले आहे. तिर्की यांच्याव्यतिरिक्त माजी मुख्यमंत्री, दोन-दोन माजी मंत्री हे भ्रष्टाचार आणि हत्येप्रकरणी सध्या तुरुंगात आहेत. 

तिर्की यांच्याविरुद्ध सीबीआयने बेहिशेबी मालमत्तेप्रकरणी 2010 रोजीच गुन्हा दाखल केला आहे. गेल्या महिन्यात तिर्की न्यायालयात हजार झाले नव्हते, तेव्हा न्यायालयाने त्यांच्याविरुद्ध अटक वॉरंट काढले. काल सीबीआयच्या पथकाने त्यांना कोलेबिरा येथून अटक केली. आज न्यायालयात हजर केले असता त्यांना चौदा दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. तिर्की यांच्याव्यतिरिक्त माजी मुख्यमंत्री मधू कोडा भ्रष्टाचारप्रकरणी तुरुंगात आहेत. कोळसा खाणीचा ठेका देण्यावरून त्यांच्यावर गंभीर आरोप ठेवण्यात आले आहेत. एकमेव अपक्ष आमदार असणारे मधू कोडा हे मुख्यमंत्री बनले होते. त्यांच्या सरकारला झामुमो आणि कॉंग्रेसने पाठिंबा दिला होता. तेव्हा राजद अध्यक्ष लालूप्रसाद यादव हे त्यांना आपला घोडा असल्याचे म्हणत होते.

झारखंडचे माजी मंत्री एनोस एक्का हे हत्याप्रकरणी तुरुंगात आहेत. त्यांच्यावर शिक्षक संतोष यांच्या हत्येचा आरोप आहे. एनोस हे मधू कोडा यांच्या मंत्रिमंडळात सदस्य होते. त्यांनाही न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. आरोग्य खात्यातील मोठ्या गैरव्यवहारप्रकरणी भानुप्रताप शाही यांनाही अटक करण्यात आली असून तेही तुरुंगात आहेत.

Web Title: Jharkhands former education minister arrested in the disproportionate assets case