मला येत असलेल्या धमक्या हा सरकारी कट - जिग्नेश मेवानी

वृत्तसंस्था
शनिवार, 9 जून 2018

मला येत असलेल्या धमक्या हा सरकारने रचलेला कट आहे, अशा प्रकारचा गंभीर आरोप गुजरातचे दलित नेते जिग्नेश मेवानी यांनी केला आहे. त्यांनी याचे स्पष्टीकरण देताना असे म्हटले आहे की, रवी पुजारीने आपल्याला मारल्यावर याचा फायदा तर थेट भारतीय जनता पक्षालाच होणार आहे. त्याचबरोबर आंबेडकरवादी आंदोलन दडपण्यासाठी हा प्रकार चालू आहे, असेही त्यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. 

अहमदाबाद - मला येत असलेल्या धमक्या हा सरकारने रचलेला कट आहे, अशा प्रकारचा गंभीर आरोप गुजरातचे दलित नेते जिग्नेश मेवानी यांनी केला आहे. त्यांनी याचे स्पष्टीकरण देताना असे म्हटले आहे की, रवी पुजारीने आपल्याला मारल्यावर याचा फायदा तर थेट भारतीय जनता पक्षालाच होणार आहे. त्याचबरोबर आंबेडकरवादी आंदोलन दडपण्यासाठी हा प्रकार चालू आहे, असेही त्यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. 

 

मेवानी यांनी केलेल्या ट्विटमध्ये त्यांनी असे म्हटले आहे की, रवी पुजारी नामक व्यक्तींने फोन करुन जिवे मारण्याची धमकी दिली आहे. तो माणूस ऑस्ट्रेलियातून बोलत असल्याचे सांगत होता. उत्तेजक भाषणबाजी बंद कर नाहीतर तुला मारून टाकू, यामध्ये उमर खालिदचाही समावेश आहे. अशी धमकी दिल्याचे मेवानी यांनी सांगितले आहे. +60176206085 या क्रमांकावरुन धमकीचा संदेश आलेला आहे तर, +75397326097 क्रमांकावरुन फोन आला असल्याची माहीतीही त्यांनी दिली आहे.

माओवाद्यांकडून राजीव गांधी हत्याकांडासारखं घातक कृत्य करण्याचा प्रयत्न होता, असं सरकारी वकिल उज्ज्वला पवार यांनी पुणे सत्र न्यायालयात सांगितलं होतं. त्यामुळे माओवाद्यांच्या निशाण्यावर नरेंद्र मोदीच तर नाहीत ना, असा प्रश्न उपस्थित होत असताना जिग्नेश मेवानी यांनी हा नवीन खुलासा केला आहे.

Web Title: jignesh mewani says I getting threats a government conspiracy?