जिग्नेश मेवानी यांनी मोदींना म्हटले 'नौटंकीबाज'

वृत्तसंस्था
गुरुवार, 14 जून 2018

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना गुजरातचे आमदार जिग्नेश मेवांनी यांनी 'नौटंकीबाज' असे म्हटले आहे. मेवांनी यांनी आपल्या अधिकृत ट्विटरवरुन एक फोटो शेअर केला आहे. त्यामध्ये नरेंद्र मोदींसारखा दिसणारा माणूस त्यांच्या समोर उभा आहे. त्याच्याकडे बोट दाखवत जिग्नेश मेवानी यांनी त्या व्यक्तीला 'नौटंकीबाज' असे संबोधले आहे.

अहमदाबाद - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना गुजरातचे आमदार जिग्नेश मेवानी यांनी 'नौटंकीबाज' असे म्हटले आहे. मेवांनी यांनी आपल्या अधिकृत ट्विटरवरुन एक फोटो शेअर केला आहे. त्यामध्ये नरेंद्र मोदींसारखा दिसणारा माणूस त्यांच्या समोर उभा आहे. त्याच्याकडे बोट दाखवत जिग्नेश मेवानी यांनी त्या व्यक्तीला नौटंकीबाज असे संबोधले आहे.

माओवादी मारणार आहेत, हे नाटक आधी बंद करा. युवकांना 2 कोटी रोजगार देण्याचे काय झाले असेही त्यांनी ट्विटमध्ये विचारले आहे. त्याचबरोबर, या देशाचा युवक रोजगाराविषयी बोलत असेल तेंव्हा मध्येच गायीचा प्रश्न उपस्थित करत जाऊ नका, समजलं का ? असा प्रश्नही त्यांनी केला आहे.

दरम्यान, जिग्नेश मेवानी यांचे हे ट्विट नरेंद्र मोदी यांना टोला असून, ते उपरोधिकपणे केलेले आहे. हा फोटो सोशल मिडियावर सध्या व्हायरल होत आहे. परंतु, या फोटोतील व्यक्ती ही नरेंद्र मोदी नसून त्यांच्यासारखी दिसणारी व्यक्ती आहे.

Web Title: jignesh mewani tweet a photo ake narendra modi photo