विवाह मंडपातून एक्स बॉयफ्रेंडने केले नवरदेवाचे अपहरण

वृत्तसंस्था
गुरुवार, 1 ऑगस्ट 2019

एक्स गर्लफ्रेंडचे दुसऱ्याबरोबर विवाह ठरला. विवाह मंडपात विवाहाची तयारी सुरू होती. काही वेळातच एक्स बॉयफ्रेंड विवाह मंडपात दाखल झाला आणि त्याने नवरदेव व त्याच्या भावाचे अपहरण केले.

जैसलमेर (राजस्थान): एक्स गर्लफ्रेंडचे दुसऱ्याबरोबर विवाह ठरला. विवाह मंडपात विवाहाची तयारी सुरू होती. काही वेळातच एक्स बॉयफ्रेंड विवाह मंडपात दाखल झाला आणि त्याने नवरदेव व त्याच्या भावाचे अपहरण केले. बारमेर जिल्ह्यातील भाटा गावात मंगळवारी (ता. 30) रात्री ही घटना घडली.

एखाद्या चित्रपटामध्ये शोभावा असा हा प्रसंग येथे घडला आहे. जालम सिंह असे संशयित आरोपीचे नाव असून, त्याने साथीदारांच्या मदतीने नवरदेव व त्याच्या भावाचे अपहरण केल्याचे उघड झाले आहे. पोलिसांनी शोध सुरू केल्यानंतर त्यांनी दोघांना जासोल भागामध्ये बुधवारी (ता. 31) सोडून दिले. पोलिस आरोपीचा शोध घेत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नगर गावात राहाणारा नरपत सिंह याचे भाटा गावात राहणाऱया युवतीशी विवाह ठरला होता. युवतीचा विवाह ठरल्यानंतर तिने जालम सिंह बरोबरचे प्रेमसंबंध तोडले. जालम सिंहला हे मान्य नव्हते. जालम पासून विवाहाची तारीख लपवण्यात आली होती. दोन्ही कुटुंबियांमध्ये विवाहाची तयारी सुरू होती. विवाहाची वेळ येऊन ठेपली होती. नरपत सिंहचे नातेवाईक भाटा गावात पोहचले होते. विवाहाची जोरदार तयारी सुरू होती. सर्वकाही सुरळीत सुरू असताना जालन सिंह त्याच्या मित्रांना घेऊन घटनास्थळी दाखल झाला. जालन सिंहने थेट नवरदेव व त्याच्या भावाचे अपहरण केले. शिवाय, वऱ्हाडी मंडळींना सुद्धा मारहाण केली. या मारहाणीत काही जण जखमी झाली असून, त्यांच्यावर सिंधारी येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या घटनेमुळे गोंधळ निर्माण झाला. नवरदेवाच्या वडिलांनी सिंधारी पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली.

दरम्यान, पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला. तपासादरम्यान वधूचे जालम सिंह बरोबर प्रेमसंबंध असल्याचे समोर आले. तिने प्रेमसंबंध संपवले होते, पण तो एकतर्फी प्रेम होते. अखेर त्याने विवाह मंडपात येऊन गोंधळ घातला व नवरदेवासह त्याच्या भावाचे अपहरण केले. पोलिस आरोपीचा शोध घेत असल्याचे समजल्यानंतर त्यांना दोघांना सोडून दिले. पोलिस जालम सिंहचा शोध घेत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Jilted lover breaks into ex wedding and kidnaps groom at rajasthan