लग्नाचा प्रस्ताव फेटाळल्याने युवतीला भोसकले

वृत्तसंस्था
शुक्रवार, 20 जानेवारी 2017

नवी दिल्ली- एकतर्फी प्रेम करणाऱया युवकाचा विवाहाचा प्रस्ताव फेटाळल्याने त्याने युवतीवर (वय 21) धारदार चाकूने भोसकले. युवतीची प्रकृती गंभीर असून, तिच्यावर उपचार सुरू आहेत, असे पोलिसांनी आज (शुक्रवार) सांगितले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमित याचे एका युवतीवर एकतर्फी प्रेम होते. युवतीसमोर त्याने अनेकदा विवाहाचा प्रस्ताव ठेवला होता. परंतु, युवतीने तो नाकारला होता. बुधवारी (ता. 18) त्याने पुन्हा एकदा विवाहाची मागणी करत धारदार शस्त्राने हल्ला केला. युवतीवर तब्बल 12हून अधिक वार केले आहेत. गंभीर जखमी झालेल्या युवतीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तिची प्रकृती गंभीर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

दरम्यान, युवतीवर एकतर्फी प्रेम करणारा युवक हा पोलिस अधिकाऱयाचा मुलगा आहे. विशेष म्हणजे त्याचा चार महिन्यांपूर्वी विवाह झाला आहे. अमितला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, पुढील तपास करत आहेत.

Web Title: Jilted lover stabs girl dozen times in Delhi