शिक्षकानं विद्यार्थिनीला जबरदस्तीनं दाखवला पॉर्न व्हिडिओ

Haryana Crime News
Haryana Crime Newsesakal
Summary

जिंदमध्ये शिक्षकाचं अत्यंत लाजिरवाणं कृत्य समोर आलंय.

हरियाणातील (Haryana) जिंदमध्ये शिक्षकाचं (Teacher) अत्यंत लाजिरवाणं कृत्य समोर आलंय. एका विद्यार्थिनीला शिकवणीदरम्यान जबरदस्तीनं पॉर्न व्हिडिओ दाखवल्याप्रकरणी जिल्हा पोलिसांनी (Police) शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल केलाय. तसंच मुलीच्या वडिलांना जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणीही त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय.

पीडितेनं दिलेल्या तक्रारीच्या आधारे महिला पोलीस स्टेशननं (Women Police Station) सांगितलं की, विद्यार्थिनी अंकुर नावाच्या व्यक्तीकडं ट्यूशन शिकण्यासाठी जात होती. दरम्यान, घरी ट्युशन शिकवत असताना शिक्षक अंकुरनं विद्यार्थिनीला जबरदस्तीनं अश्लील व्हिडिओ दाखवला. त्यानंतर मुलीनं घरी जाऊन पालकांकडं तक्रार केली. यानंतर मुलीनं ट्यूशनला जाणंच बंद केलं.

Haryana Crime News
बंगळुरूमध्ये दोन वर्षाच्या चिमुरडीची बलात्कार करून हत्या

तक्रारीनुसार, घटनेनंतर विद्यार्थिनीनं ट्यूशनला जाणं बंद केलं, तेव्हा शिक्षकानं विद्यार्थिनीचा पाठलाग सुरू केला. एकेदिवशी शिक्षकानं तिच्या वडिलांच्या गाडीसमोर बाईक लावून जीवे मारण्याची धमकीही दिली. त्यानंतर पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आलीय. पोलिसांनी त्या शिक्षकावर गुन्हा दाखल केला असून आरोपी सध्या फरार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com