जिनांना भारताची फाळणी नको होती : फारूख अब्दुल्ला 

वृत्तसंस्था
रविवार, 4 मार्च 2018

भारताची फाळणी होऊन पाकिस्तानची निर्मिती व्हावी ही मोहम्मद अली जिना यांची भूमिका नव्हती. मुस्लिम, शिख आणि इतर अल्पसंख्याकाना विशेषाधिकार दिला पाहिजे यासाठी एक समिती स्थापण्यात आली होती.

नवी दिल्ली : पंडित जवाहरलाल नेहरू, मौलाना आझाद आणि सरदार वल्लभभाई पटेल यांच्यामुळे देशाची फाळणी झाली असा खळबळजनक आरोप जम्मू काश्‍मीरचे माजी मुख्यमंत्री फारूख अब्दुल्ला यांनी केला आहे. 

एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी म्हटले आहे, की भारताची फाळणी होऊन पाकिस्तानची निर्मिती व्हावी ही मोहम्मद अली जिना यांची भूमिका नव्हती. मुस्लिम, शिख आणि इतर अल्पसंख्याकाना विशेषाधिकार दिला पाहिजे यासाठी एक समिती स्थापण्यात आली होती. मोहम्मद अली जिना यांनी विशेषाधिकार समितीच्या मागणीला पाठिंबा दिला होता. मात्र त्यावेळी पंडित जवाहरलाल नेहरू, मौलाना आझाद आणि सरदार पटेल यांनी हा विशेषाधिकार दिला नाही. त्यामुळे नाईलाजाने फाळणी करावी लागली. फाळणीला बॅ. मोहम्मदअली जीना जबाबदार नव्हते. तर या तिघांमुळेच देशाचा तुकडा पडला. 

अब्दुल्ला यांनी म्हटले आहे, की या तिन्ही नेत्यांनी निर्णय घेण्यात चूक केली नसती तर देशाची फाळणी झालीच नसती. आधी पाकिस्तान आणि त्यानंतर बांगलादेशची निर्मिती झालीच नसती. भारत अखंड राहिला असता.
 

Web Title: Jinnah initially did not want a Pakistan for Muslims says Farooq Abdullah