कुलगाममध्ये चकमकीत 1 दहशतवादी ठार

वृत्तसंस्था
शनिवार, 2 सप्टेंबर 2017

चकमकीत ठार मारण्यात आलेला दहशतवादी लष्करे तैयबाचा असून, इश्फाक पद्दार असे त्याचे नाव आहे. त्याला ठार मारण्यात आल्यानंतर शोपियाँ आणि कुलगाममध्ये मोबाईल इंटरनेट सेवा बंद ठेवण्यात आली आहे.

जम्मू - जम्मू काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यात आज (शनिवार) सकाळी सुरक्षा रक्षक आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत 1 दहशतवादी ठार झाला आहे.

पाकिस्तानी सैन्याने शुक्रवारी बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर सीमेवर शस्त्रसंधीचे उल्लंघन करत गोळीबार केला होता. या गोळीबारात दोन पोलिस जवान हुतात्मा झाले होते. त्यानंतर कुलगाममध्ये दहशतवाद्यांबरोबर चकमक झाली असून, एक दहशतवाद्याचा खात्मा करण्यात आला आहे. कुलगाममधील तंत्यापुरा येथे ही चकमक झाली असून, परिसरात शोधमोहिम राबविण्यात येत आहे.

चकमकीत ठार मारण्यात आलेला दहशतवादी लष्करे तैयबाचा असून, इश्फाक पद्दार असे त्याचे नाव आहे. त्याला ठार मारण्यात आल्यानंतर शोपियाँ आणि कुलगाममध्ये मोबाईल इंटरनेट सेवा बंद ठेवण्यात आली आहे. पद्दारचा लेफ्टनंट उमर फय्याज यांच्या हत्या प्रकरणात समावेश होता.

Web Title: J&K: 1 terrorist killed in encounter with security forces in Kulgam