माछिल सेक्टरमध्ये घुसखोरीचा कट उधळला; 2 दहशतवाद्यांचा खात्मा

वृत्तसंस्था
शनिवार, 16 सप्टेंबर 2017

आज (शनिवार) पहाटे सीमेपलिकडून दहशतवादी घुसखोरी करत असल्याचे दिसल्यानंतर लष्कराकडून ही कारवाई करण्यात आली. यामध्ये दोन दहशतवाद्यांना ठार मारण्यात आले असून, या भागात शोध मोहिम सुरु आहे. मागच्या काही महिन्यात जवानांनी दहशतवाद्यांचे घुसखोरीचे अनेक प्रयत्न उधळून लावले आहेत. पाकिस्तानी सैन्याकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन करत केलेल्या गोळीबारावेळी दहशतवाद्यांकडून घुसखोरी केली जाते.

कुपवाडा : जम्मू-काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यातील माछिल सेक्टरमध्ये दहशतवाद्यांचा घुसखोरीचा कट उधळून लावत सुरक्षा रक्षकांनी दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला. 

लष्करी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आज (शनिवार) पहाटे सीमेपलिकडून दहशतवादी घुसखोरी करत असल्याचे दिसल्यानंतर लष्कराकडून ही कारवाई करण्यात आली. यामध्ये दोन दहशतवाद्यांना ठार मारण्यात आले असून, या भागात शोध मोहिम सुरु आहे. मागच्या काही महिन्यात जवानांनी दहशतवाद्यांचे घुसखोरीचे अनेक प्रयत्न उधळून लावले आहेत. पाकिस्तानी सैन्याकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन करत केलेल्या गोळीबारावेळी दहशतवाद्यांकडून घुसखोरी केली जाते. आज सलग चौथ्या दिवशी पाकिस्तानी सैन्याकडून सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) चौक्यांवर गोळीबार करण्यात आला. 

अमरनाथ यात्रेकरूंच्या बसवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा मुख्य सूत्रधार अबू इस्माईल याला दोन दिवसांपूर्वी ठार मारण्यात लष्कराला यश आले होते. नौगाम येथे झालेल्या चकमकीत सुरक्षा जवानांनी अबू इस्माईलला ठार केले होते. अबू इस्माईल पाकिस्तानी नागरिक आहे, अबू दुजानासोबत त्याने काश्मीरमधील अनेक अतिरेकी हल्ल्यांमध्ये सहभाग घेतला होता.

Web Title: J&K: 2 terrorists shot dead while making infiltration bid