काश्मीरमध्ये नौगाव सेक्टरमध्ये चकमक; 3 जवान हुतात्मा

वृत्तसंस्था
रविवार, 21 मे 2017

शनिवारी लष्कराने सात दहशतवाद्यांचा घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला होता. या वेळी चकमकीत दोन जवान हुतात्मा झाले; तर दोन दहशतवाद्यांना ठार करण्यात यश आले होते. आज पुन्हा दहशतवादी आणि जवानांमध्ये चकमक झाली.

श्रीनगर - उत्तर काश्‍मीरमध्ये नौगाव सेक्‍टरमध्ये आज (रविवार) दुसऱ्या दिवशीही दहशतवादी आणि लष्करी जवानांमध्ये चकमक सुरुच असून, या चकमकीत तीन जवान हुतात्मा झाले आहेत. तर, चार दहशतवाद्यांना ठार मारण्यात आले आहे.

शनिवारी लष्कराने सात दहशतवाद्यांचा घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला होता. या वेळी चकमकीत दोन जवान हुतात्मा झाले; तर दोन दहशतवाद्यांना ठार करण्यात यश आले होते. आज पुन्हा दहशतवादी आणि जवानांमध्ये चकमक झाली. शनिवारी उर्वरित दहशतवाद्यांनी तेथून पळ काढला होता. या दहशतवाद्यांचा शोध घेण्यात येत असताना जवानांवर गोळीबार करण्यात आला. यामध्ये तीन जवान हुतात्मा झाले आहेत. तर चार दहशतवाद्यांना ठार मारण्यात जवानांना यश आले. 

घटनास्थळावरून शस्त्रे हस्तगत केली असून, परिसरात शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे. सात दहशतवाद्यांच्या गट भारतीय सीमेत घुसला होता. हा गट बराच अंतर आतमध्ये आला होता. या वेळी राष्ट्रीय रायफल्सच्या गस्तीपथकाने घुसखोरी होत असल्याचे पाहून दहशतवाद्यांना शरणागती पत्करण्याचे आवाहन केले. मात्र दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला.

Web Title: J&K: 4 terrorists killed in #Nowgam encounter, 3 jawans also martyred