काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला; दोघांना कंठस्नान

वृत्तसंस्था
रविवार, 5 फेब्रुवारी 2017

श्रीनगर- सोपोर येथे जम्मू-काश्मीर पोलिसांनी एका संशयित वाहनाला रोखून एक मोठ्या दहशतवादी हल्ल्याचा कट उधळून लावला. यावेळी झालेल्या चकमकीत दोन प्रमुख दहशतवाद्यांना पोलिसांनी कंठस्नान घातले. 

विशेष म्हणजे त्या दहशतवाद्यांमध्ये अमरगड येथील एक उच्चशिक्षित प्राध्यापकाचा समावेश आहे. दरम्यान, जम्मू-काश्मीर पोलिसांच्या घुसखोरीविरोधी पथकातील वरिष्ठ अधिकारी आणि त्यांचा एक सहकारी हे या कारवाईदरम्यान जखमी झाले. 

एका वाहनातून दहशतवादी जात असल्याची खबर मिळाल्यावर पोलिस आणि सुरक्षा फौजांनी तत्पर कारवाई सुरू केली, आणि सोपोरमधील अमरगड येथे त्यांनी संबंधित वाहनाला गाठून रोखले. त्यावेळी दहशतवाद्यांनी पोलिसांच्या पथकावर ग्रेनेड फेकून बंदुकीने गोळीबार करीत हल्ला केला. यामध्ये बारामुल्लाचे पोलिस अधीक्षक शफकत हुसेन आणि पोलिस उपनिरीक्षक मोहंमद मुर्तझा हे जखमी झाले. 
प्रत्युत्तरादाखल पोलिसांनी केलेल्या हल्ल्यात दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले. त्यांची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे. दोन एके रायफली, एक पिस्तुल, 4 हँडग्रेनेड, तसेच इतर शस्त्रे आणि दारूगोळा घटनास्थळावरून ताब्यात घेतला असल्याचे पोलिसांनी सांगितले. 
 
Web Title: J&K police foils terror attack, kill two militants