'जैश'ने दिला होता हल्ल्याचा इशारा; 'हे' आहेत हल्ल्याचे सूत्रधार

J&K Police shared threats posed by Jaish on Twitter two days before to Pulwama terror attack
J&K Police shared threats posed by Jaish on Twitter two days before to Pulwama terror attack

पुलवामा आत्मघाती हल्ल्याचा इशारा दोन दिवस आधीच देण्यात आला होता, असा दावा जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी केला आहे. पोलिसांना गुप्तचरांकडून ही माहिती प्राप्त झाली होती. ज्यात 'सुरक्षा दलावर आत्मघाती हल्ला होणार आहे. असे ट्विट पाकिस्तानातील जैश-ए-महम्मंद कडून करण्यात आले होते.' अशी माहिती गुरुवारी पोलिस अधिकाऱ्यांनी दिली. 

केंद्रीय राखीव पोलीस दलाचे (सीआरपीएफ) 39 जवान या हल्ल्यात हुतात्मा झालेत. देशाच्या इतिहासातील सर्वात मोठ्या हल्ल्यांपैकी एक हा हल्ला आहे. ज्यात 76 व्या बटालियनचे जवान असलेल्या वाहनाच्या चिंधड्या उडाल्या. जैश चा आत्मघाती बॉम्ब असलेला आदिल दार याने 350 किलोचे स्फोटक असलेली गाडी घटनास्थळी उभी केली होती. 

'313-get' असे संबंधित ट्विटर हँन्डलचे नाव आहे. हे हँन्डल प्रायवेट केले आहे. यावरुन काही दिवसांपूर्वी 33 सेकंदांचा व्हिडीओ अपलोड करण्यात आला होता. या व्हिडीयोत सोमालिया येथे दहशतवाद्यांनी तसाच हल्ला केला जसा काल सीआरपीएफ च्या जवानांवर केला. या व्हिडीओत 'इंशाहअल्ला, काश्मीर मे यही होगा' असे म्हटले गेले होते. व्हर्च्युअल प्रायव्हेट नेटवर्कचा वापर करुन ट्विटर हँन्डल चालविले जात आहे. यामुळे सुरक्षा एजन्सींना ऑपरेटरचे ठिकाण सापडणे शक्य होत नाही आहे. त्यामुळे व्हिडीओ कुठून पोस्ट करण्यात आला आहे, ती जागा शोधून काढणे कठीण ठरते आहे.

हे आहेत भ्याड हल्ल्याचे सूत्रधार :
जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे सीआरपीएफ ताफ्यावरील दहशतवादी हल्ल्याचा, दहशतवादी अब्दुल रशीद गाझी हा सूत्रधार असल्याची माहिती समोर आली आहे. अफगाण युद्धातील हा दहशतवादी आहे. जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मौलाना मसूद अझहरचा निकटवर्तीय म्हणून तो ओळखला जातो. मसूद अझहरने अफगाणिस्तानमध्ये अमेरिकी सैन्याविरोधातील कारवायांसाठी अब्दुल रशीदला तिथे पाठवले होते. अब्दुल हा आयईडीद्वारे स्फोट घडवण्यासाठी ओळखला जातो. सध्या अब्दुल हा जम्मू-काश्मीरमध्येच असल्याची माहिती देखील गुप्तचर यंत्रणांना जानेवारीत मिळाली होती. तर 20 वर्षीय आदिल दार हा वयाच्या 19 व्या वर्षीच 2018 मध्ये जैश मध्ये सामिल झाला होता.   

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com