सेक्‍स स्कॅंडलप्रकरणी पाच आरोपींना दहा वर्षांचा कारावास; बीएसएफच्या माजी पोलिस उपमहानिरीक्षकाचा समावेश 

पीटीआय
गुरुवार, 7 जून 2018

काय आहे प्रकरण? 
जम्मू- काश्‍मीर पोलिसांच्या हाती लागलेल्या दोन सीडींमुळे 2006मध्ये सर्वत्र खळबळ उडाली होती. या सीडीमुळे काश्‍मीरमधील हाय-प्रोफाइल सेक्‍स स्कॅंडल उघडकीस आले होते. काश्‍मीरमधील एका अल्पवयीन मुलीच्या लैंगिक शोषणाची ही सीडी होती. पोलिस चौकशीदरम्यान अनेक बडी नावे समोर आली होती. तब्बल 56 संशयितांची यादी पोलिसांनी बनवली होती. त्यानंतर हे प्रकरण चौकशीसाठी सीबीआयकडे सोपवण्यात आले होते. या प्रकरणातील मुख्य आरोपी सबीना आणि तिचा पती अब्दुल हमीद या दोघांचा आधीच मृत्यू झाला आहे.

चंडीगड - जम्मू- काश्‍मीरमध्ये 2006 मध्ये घडलेल्या हाय-प्रोफाइल सेक्‍स स्कॅंडलप्रकरणी विशेष केंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय) न्यायालयाने आज सीमा सुरक्षा दलाचे (बीएसएफ) माजी पोलिस उपमहानिरीक्षक के. सी. पाधी, जम्मू- काश्‍मीर पोलिस दलातील एन्काउंटर स्पेशालिस्ट माजी पोलिस उपअधीक्षक महंमद अश्रफ मीर यांच्यासह पाच जणांना प्रत्येकी 10 वर्षे कारावासाची शिक्षा ठोठावली. 

अहमद मक्‍सूद, शब्बीर अहमद लांगू आणि शब्बीर अहमद लावाय अशी शिक्षा ठोठावण्यात आलेल्या अन्य तीन आरोपींची नावे आहेत. पाधी आणि मीर यांना प्रत्येकी एक लाख रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. दंडाची रक्कम न भरल्यास दोघांनाही अतिरिक्त एक वर्ष सश्रम कारावास भोगावा लागणार आहे. अन्य तिघांना प्रत्येकी 50 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला असून, ही रक्कम न भरल्यास त्यांना अतिरिक्त सहा महिने कारावास भोगावा लागणार आहे. 

विशेष सीबीआय न्यायाधीश गगनगीत कौर यांनी ही शिक्षा ठोठावली. याआधी या सर्व आरोपींना 30 मे रोजी दोषी ठरवण्यात आले होते. या प्रकरणात आधीच दोन आरोपींना दोषमुक्त करण्यात आलेले आहे. त्यात जम्मू- काश्‍मीरच्या तत्कालीन महाधिवक्‍त्यांचाही समावेश आहे. 

काय आहे प्रकरण? 
जम्मू- काश्‍मीर पोलिसांच्या हाती लागलेल्या दोन सीडींमुळे 2006मध्ये सर्वत्र खळबळ उडाली होती. या सीडीमुळे काश्‍मीरमधील हाय-प्रोफाइल सेक्‍स स्कॅंडल उघडकीस आले होते. काश्‍मीरमधील एका अल्पवयीन मुलीच्या लैंगिक शोषणाची ही सीडी होती. पोलिस चौकशीदरम्यान अनेक बडी नावे समोर आली होती. तब्बल 56 संशयितांची यादी पोलिसांनी बनवली होती. त्यानंतर हे प्रकरण चौकशीसाठी सीबीआयकडे सोपवण्यात आले होते. या प्रकरणातील मुख्य आरोपी सबीना आणि तिचा पती अब्दुल हमीद या दोघांचा आधीच मृत्यू झाला आहे.

Web Title: J&K Sex Scandal: Five, Including Former DSP & DIG BSF, Get 10 Years Imprisonment For Rape