पाककडून भाजप अध्यक्षाला जीवे मारण्याची धमकी

वृत्तसंस्था
गुरुवार, 21 जून 2018

श्रीनगरः जम्मू-काश्मीरमधील भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष रविंदर रैना यांना गेल्या दोन दिवसांपासून जीवे मारण्याची धमकी देणारे दूरध्वनी येत आहेत. पंरतु, अशा धमक्यांना घाबरणार नाही, असे रैना यांनी आज (गुरुवार) म्हटले आहे.

'पाकिस्तानमधील कराची, रावळपिंडी, मुजफ्फरबादसह विविध शहरांमधून धमकीचे दूरध्वनी येत आहेत. याबाबतची माहिती राज्यपाल एन. एन. व्होरा व सुरक्षा यंत्रणांना दिली आहे. मी हिंदू असून, अशा गोष्टींना घाबरत नसून, देवावर विश्वास ठेवतो,' असे रैना यांनी सांगितले.

राज्याचे पोलिस महासंचालक एस. पी. वैद्य यांनी सांगितले की, 'रैना यांना धमकीचे दूरध्वनी येत आहेत. त्यांना याबाबतची माहिती पोलिसांना दिली असून, यावर आम्ह लक्ष ठेवून आहोत.'

Web Title: JK state BJP chief Ravinder Raina claims getting threats from Pakistan