'जेएनयू'तील शुल्कवाढ अखेर रद्द 

पीटीआय
बुधवार, 13 नोव्हेंबर 2019

- विद्यार्थ्याच्या आंदोलनासमोर विद्यापीठ नमले

नवी दिल्ली : दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या (जेएनयू) प्रशासनाने विविध शैक्षणिक शुल्कांमध्ये केलेली वाढ अखेर आज रद्द करण्याचा निर्णय घेतला. या शुल्कवाढीविरोधात विद्यार्थ्यांनी दोन दिवसांपासून तीव्र आंदोलन छेडले होते. या आंदोलनापुढे सरकारला माघार घ्यावी लागली असून, केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयानेच आज या संदर्भात ट्‌विट करून त्याची माहिती दिली. 

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

विद्यापीठाच्या कार्यकारी समितीने वसतिगृहांप्रमाणेच अन्य शुल्कांमध्ये केलेली वाढ रद्द करण्याचा निर्णय घेतला असून, आर्थिकदृष्ट्या मागास घटकांतील विद्यार्थ्यांना आर्थिक मदत करण्याच्या अनुषंगाने विशेष योजनेचा प्रस्तावही मांडण्यात आला आहे. मध्यंतरी विद्यापीठाने प्रशासकीय शुल्क, भांडी आणि वर्तमानपत्रासंबंधीच्या शुल्कात वाढ करण्याचा निर्णय घेतला होता. खोलीच्या भाड्यामध्येही मोठी वाढ करण्यात आली होती. या आंदोलनाची तीव्रता आणखी वाढल्यास त्याचा एकूणच शैक्षणिक कार्यावर विपरित परिणाम होऊ शकतो, ही भीती लक्षात घेऊन ही शुल्कवाढ मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

पवारांनी धनंजय मुंडेंची 'का' करून दिली काँग्रेसच्या चाणक्याला विशेष ओळख

विद्यार्थ्यांच्या आंदोलनामुळे विद्यापीठाच्या कार्यकारी समितीची बैठक देखील कॅम्पसच्या बाहेर घेण्याचा निर्णय घेण्यात आला होता. दरम्यान, विद्यापीठाच्या या शुल्कवाढीला डाव्या आणि उजव्या अशा दोन्ही संघटनांनी विरोध केला होता, तसेच विद्यापीठ अनुदान आयोगाच्या कार्यालयावर मोर्चा काढण्याचा निर्धारही या संघटनांनी केला होता. 

या मुद्‌द्‌यावर कुलगरूंची भेट होत नाही तोवर आम्ही आंदोलन माघारी घेणार नाहीत. 

- ऐश घोष, अध्यक्ष, विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: JNU Announces Partial Rollback In Fee Hike