शेहला रशीद राष्ट्रदोही, तिच्याकडून जीवाला धोका; वडिलांनीच पोलिसांकडे केली तक्रार

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 1 December 2020

शेहला स्वतःला बेरोजगार सांगते. मग तिच्याकडे एवढे पैसे कुठून आले. याचीही चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी तिच्या वडिलांनी केली आहे.

श्रीनगर- जवाहरलाल नेहरु विद्यापीठाची (जेएनयू) माजी विद्यार्थी नेता शेहला रशीद शोराकडून आपल्या जीवाला धोका असल्याची तक्रार खुद्द शेहला यांच्या वडिलांनीच जम्मू-काश्मीरच्या पोलिस महासंचालकांकडे केली आहे. याबाबत त्यांनी पोलिस महासंचालकांना पत्र लिहिले आहे. त्यामध्ये त्यांनी मुलगी शेहला रशीदवर गंभीर आरोप केले आहेत. शेहला ही राष्ट्रविरोधी असून तिच्यामुळे आपल्या जीवाला धोका आहे, असा आरोप त्यांनी आपल्या पत्रात केला आहे. दरम्यान, शेहला यांनी आपल्या वडिलांचे सर्व आरोप फेटाळले आहेत. 

अब्दुल रशीद यांनी आपल्या पत्रात म्हटले की, त्यांची मुलगी शेहला ही देशविरोधी कृत्यांमध्ये सामील आहे. तीन पानांच्या पत्रात त्यांनी शेहलाला तिची मोठी बहीण, आई आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांचा पाठिंबा असल्याचे अब्दुल रशीद यांनी म्हटले आहे. 

हेही वाचा- आठवण 32 वर्षांपूर्वीच्या शेतकरी आंदोलनाची; राजीव गांधी सरकारला झुकवणारा रांगडा नेता

वडिलांनी केलेल्या आरोपांचे शेहला रशीद यांनी खंडन केले. टि्वट करत त्यांनी खुलासा केला की, आपल्यापैकी अनेकांनी माझ्या वडिलांचा व्हिडिओ पाहिला असेल. त्यामध्ये ते मला, माझी बहीण आणि माझ्या आईविरोधात गंभीर आरोप करत आहेत. थेट शब्दांत सांगायचं तर ते आपल्या पत्नीला मारहाण करणारे आणि शिवीगाळ करणारे व्यक्ती आहेत. अखेर आम्ही त्यांच्याविरोधात जाण्याचा निर्णय घेतला. हा स्टंट त्याचाच परिणाम आहे. 

हेही वाचा- लशीच्या बाबतीत भारत ‘आत्मनिर्भर’

दरम्यान, शेहला यांनी जम्मू-काश्मीर पीपल्स मुव्हमेंटसाठी 3 हजार कोटी रुपये घेतल्याचा दावा अब्दुल रशीद यांनी केला आहे. ते म्हणाले की, ती एनजीओही चालवते, त्या एनजीओंची चौकशी केली जावी. तसेच ती कायदेशीर कागदपत्रांमध्ये स्वतःला बेरोजगार सांगते. मग तिच्याकडे एवढे पैसे कुठून आले. याचीही चौकशी झाली पाहिजे. सर्वांनाच माहीत झाले आहे की, फंडिंग कुठून येत आहे आणि का येत आहे. मी तिला तीन वर्षे समजवत होतो, असेही त्यांनी म्हटले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: JNU former leader Shehla Rashid involved in anti national activities sensational allegations father made by father