जेएनयू' विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्षास नोटीस

पीटीआय
बुधवार, 4 जानेवारी 2017

दरम्यान, प्रशासनाकडून कारणे दाखवा नोटिसा काढून विद्यार्थी संघटनेचा आवाज दडपण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप मोहित पांडे याने केला आहे. विद्यापीठातील प्राध्यापकांचा आम्हाला पाठिंबा असून, उद्या होत असलेल्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर ही निदर्शने सुरूच राहतील, असे मोहितने म्हटले आहे

नवी दिल्ली - जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील (जेएनयू) विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष मोहित पांडे याला आज विद्यापीठ प्रशासनाने नोटीस बजावली आहे. विद्यापीठात सुरू असलेली निदर्शने न थांबवल्यास कारवाईचा इशारा या नोटिशीद्वारे देण्यात आला आहे.

शैक्षणिक परिषदेच्या (एसी) बैठकीत व्यत्यय आणणाऱ्या नऊ विद्यार्थ्यांवर प्रशासनाने निलंबनाची कारवाई केली होती. त्याविरोधात ही निदर्शने सुरू आहेत. दरम्यान, प्रशासनाकडून कारणे दाखवा नोटिसा काढून विद्यार्थी संघटनेचा आवाज दडपण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप मोहित पांडे याने केला आहे. विद्यापीठातील प्राध्यापकांचा आम्हाला पाठिंबा असून, उद्या होत असलेल्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर ही निदर्शने सुरूच राहतील, असे मोहितने म्हटले आहे.

Web Title: JNU issues notice to Student Union President