जेएनयू मधील आंदोलन सुरूच 

jnu
jnu

नवी दिल्ली - जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील (जेएनयू) वसतिगृह आणि मेसचे शुल्क वाढविण्याच्या विरोधात गेल्या चार ते पाच दिवसांपासून सुरू असलेले आंदोलन शनिवारीही सुरूच राहिले. शनिवारी विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ दिल्लीत मोठ्या संख्येने लोक रस्त्यावर उतरले आहेत. 

यावेळी आंदोलकांना समर्थन करणाऱ्या नागरिकांनी घोषणाबाजी करत शुल्कवाढ मागे घ्यावी अशी मागणी केली. शनिवारी रस्त्यावर उतरलेल्या नागरिकांमध्ये जेएनयूचे माजी विद्यार्थी, शिक्षक व विद्यार्थ्यांचा समावेश होता. यावेळी निदर्शकांनी मंडी हाऊस येथून मोर्चाला सुरुवात करत घोषणाबाजी करत विद्यापीठाने शुल्कवाढ मागे घ्यावे अशी मागणी करत सरकारला सर्वांना परवडणारे शिक्षण द्या अशी मागणी केली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com