कन्हैया कुमारसह 10 जणांवरील आरोपपत्र न्यायालयाने फेटाळले 

Kanhaiya Kumar
Kanhaiya Kumar

नवी दिल्ली : दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (जेएनयू) तीन वर्षांपूर्वी झालेल्या कथित देशविरोधी घोषणाबाजीच्या विरोधात दिल्ली पोलिसांच्या विशेष सेलने जेएनयू विद्यार्थी संघटनेचा तत्कालीन अध्यक्ष कन्हैया कुमार, उमर खालीद, अनर्बन भट्टाचार्य यांच्यासह १० जणांवर दाखल केलेले आरोपपत्र न्यायालयाने फेटाळले. यासह न्यायालयाने दिल्ली पोलिसांना फटकारले आहे. 

या प्रकरणात तब्बल १२०० पानी आरोपपत्र व एक ट्रंकभरून पुरावे दिल्ली पोलिसांनी गोळा केले होते. यात सर्वांवर देशद्रोहाचा आरोप ठेवण्यात आला असून भारतविरोधी घोषणांच्या ध्वनिचित्रफिती, फेसबुक डाटा व न्यायववैद्यक पुराव्यांचा समावेश होता. पतियाळा हाउस न्यायालयाने आज सुनावणीदरम्यान दिल्ली सरकारच्या परवानगीशिवाय आरोपपत्र पोलिस दाखलच कसे करू शकतात, यावर प्रश्न उपस्थित करत सरकारला फटकारले. दिल्ली पोलिसांनी यावर लवकरच आरोपपत्राला दिल्ली सरकारची मंजुरी मिळेल असे म्हटले आहे.

कन्हैयाकुमार याने नुकतेच यावर प्रतिक्रिया देताना, ‘थॅंक्स मोदीजी’ अशी उपरोधात्मक प्रतिक्रिया दिली होती. जेएनयूमध्ये ९ फेब्रुवारी २०१६ च्या संध्याकाळी संसदेवरील हल्ल्याचा सूत्रधार असलेला काश्‍मिरी दहशतवादी महंमद अफजल गुरू याच्या स्मरणार्थ एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी आवश्‍यक ती परवानगीची प्रक्रिया पूर्ण केलेली नव्हती, असा पोलिसांचा आरोप आहे. या कार्यक्रमात देशविरोधी घोषणा देण्यात आल्याचा पोलिसांचा आरोप आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com