जेएनयू प्रकरणी कन्हैया कुमार अडचणीत; आरोपपत्र दाखल

Kanhaiya Kumar
Kanhaiya Kumar

नवी दिल्ली : दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (जेएनयू) 2016 मध्ये देण्यात आलेल्या देशविरोधी घोषणांप्रकरणी दिल्ली पोलिसांनी आज (सोमवार) विद्यार्थी नेता कन्हैया कुमारसह अन्य काही जणांवर आरोपपत्र दाखल केले आहे.

दिल्ली पोलिसांनी देशद्रोहाचा आरोप करत कलम 124 अंतर्गत आरोपपत्र दाखल केले असून, अनेक कलमे लावण्यात आली आहेत. पोलिसांनी दाखल केलेल्या आरोपपत्रात कन्हैया कुमारसह, उमर खालीद, अनिर्बन भट्टाचार्य, अकिब हुसेन, मुजीब हुसेन, मुनीब हुसेन, उमर गुल, राईया रसूल, बशीर भट्ट यांच्यासह अन्य जणांचा समावेश आहे.

न्यायदंडाधिकारी सुमीत आनंद यांच्याकडे हे आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणावर आता मंगळवारी सुनावणी होण्याची शक्यता आहे. 2016 मध्ये घडलेल्या या प्रकरणानंतर देशभरात वादळ उठले होते. कन्हैया कुमारने पंतप्रधान नरेंद्र मोदींसह केंद्र सरकारला यानंतर कायम लक्ष्य केलेले आहे. आता या प्रकरणी आरोपपत्र दाखल झाल्याने कन्हैयासह इतरांना न्यायालयीन प्रक्रियेला सामोरे जावे लागणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com