'जेएनयू'तील विद्यार्थीनीवर अफगाणी युवकांकडून बलात्कार

वृत्तसंस्था
शनिवार, 21 जानेवारी 2017

या प्रकरणी युवतीने जेएनयूतील विद्यार्थ्यांना माहिती दिल्यानंतर त्यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. मुलीची वैद्यकीय चाचणी करण्यात येत आहे.

नवी दिल्ली - दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (जेएनयू) पदवीचे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यीनीवर अफगाणिस्तानमधील दोन युवकांकडून बलात्कार करण्याची माहिती पोलिसांनी आज (शनिवार) दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दक्षिण दिल्लीतील ग्रीनपार्क भागात ही घटना घडली. हौज खास येथील एका पबमध्ये पिडीत युवती आपल्या मित्रासोबत गेली असताना तेथे तिची तवाब अहमद (वय 27) या अफगाणी युवकाशी भेट झाली. तो दिल्लीत सुलेमान अहमदी (वय 31) या अफगाणी युवकासोबत राहतो. तवाबने या मुलीला व तिच्या मित्रांना पार्टीसाठी घरी बोलविले होते. तिच्यासोबत तिचे अन्य तिघेजण त्यांच्या घरी गेले. त्याठिकाणी या युवतीला दारू पिण्यास प्रवृत्त करून दोघांनी बलात्कार केला.

या प्रकरणी युवतीने जेएनयूतील विद्यार्थ्यांना माहिती दिल्यानंतर त्यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. मुलीची वैद्यकीय चाचणी करण्यात येत आहे. या दोन्ही अफगाणी युवकांना अटक करण्यात आली असून, त्यांची कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.

Web Title: JNU Student Alleges Rape by 2 Afghan Nationals in Delhi