दहावी, बारावी उत्तीर्णांसाठी 'इस्रो'मध्ये सुवर्णसंधी

वृत्तसंस्था
मंगळवार, 18 जून 2019

भारतीय अंतराळ संशोधन संस्थेत (इस्रो) विविध पदांसाठी भरती केली जाणार आहे.​

नवी दिल्ली : भारतीय अंतराळ संशोधन संस्थेत (इस्रो) विविध पदांसाठी भरती केली जाणार आहे. तुम्ही जर दहावी आणि बारावी उत्तीर्ण असाल, तर या सुवर्णसंधीचा अवश्य लाभ घ्या.

फिटर, इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक, टर्नर,  वेल्डर, प्लंबर आणि इतर अशा एकूण 41 रिक्त पदांसाठी भरती होणार आहे. जे विद्यार्थी दहावी (एसएससी) आणि बारावी (एचएससी) उत्तीर्ण झाले आहेत ते या पदांसाठी अर्ज करू शकतात. अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे आयटीआय/ एनटीसी/ एनएसी संबंधित शाखेतील प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.

आजपासून (मंगळवार) या विविध पदांसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख 2 जुलै आहे.

रिक्त पदांबद्दल अधिक माहिती खालीलप्रमाणे :

पदाचे नाव :
फिटर, इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक, टर्नर, वेल्डर, प्लंबर आणि इतर

एकूण रिक्त पदांची संख्या :
41 पदे

पात्रता :
उमेदवार दहावी (एसएससी) किंवा बारावी (एचएससी) उत्तीर्ण असावा. तसेच उमेदवाराकडे आयटीआय/ एनटीसी/ एनएसी शाखेतील प्रमाणपत्र असावे. पात्रता संबंधित अधिक माहितीसाठी अधिकृत सूचना पाहा.

वयोमर्यादा :
2 जुलै 2019 पर्यंत उमेदवाराचे कमाल वय 35 वर्षांपेक्षा जास्त नसावे.

वेतन :
दरमहा वेतन 18,000 ते 69,100 रुपये असेल. वेगवेगळ्या पदांनुसार वेतन असणार आहे.

इच्छुक उमेदवारांनी www.lpsc.gov.in या अधिकृत संकेतस्थळास भेट द्यावी.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Job Recruitment for SSC and HSC students in ISRO

टॅग्स