पाच हजार सरकारी जागांसाठी भरती? सगळे डीटेल्स आहेत, लगेच बघा ! 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 16 ऑक्टोबर 2019

देशातील डाक सेवा म्हणजेच पोस्ट खात्यात तब्बल पाच हजार जागांची भरती प्रक्रिया आता सुरु करण्यात आली आहे. त्यामुळे तुम्ही दहावी पास असाल तर या जागांवर अर्ज भरू शकतात.   

देशात सध्या अनके क्षेत्रांमध्ये मंदीचं सावट आहे. अशात सर्व बेरोजगार तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. एक अशी सरकारी जागा आहे जिथे तरुणांसाठी तब्बल पाच हजार जागा आहे. आणि तुम्ही फक्त दहावी पास असाल तरीही या जागांसाठी अर्ज करू शकतात. 

देशातील डाक सेवा म्हणजेच पोस्ट खात्यात तब्बल पाच हजार जागांची भरती प्रक्रिया आता सुरु करण्यात आली आहे. त्यामुळे तुम्ही दहावी पास असाल तर या जागांवर अर्ज भरू शकतात.   

कुठे किती जागा : 

तेलंगणा, आंध्रप्रदेश आणि छत्तीसगढमध्ये सध्या पोस्टाच्या पाच हजार जागा आहेत. यामध्ये सेवा विभागातील ब्रांच पोस्ट मास्तर, असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्तर आणि पोस्ट सेवक पदांची भरती केली जाणार आहे.

  • तेलंगाणामध्ये 970 जागा 
  • आंध्र प्रदेशातमध्ये 2707 जागा 
  • छत्तीसगडमध्ये 1799 जागा  

कुठे कराल अर्ज : 

  • या भरतीची सगळी माहिती तुम्हाला indiapost.gov या संकेतस्थळावर मिळेल.
  • 15 ऑक्टोबर ते 14 नोव्हेंबरपर्यंत तुम्ही नोकरीसाठी अर्ज करू शकतात 
  • विविध पदांबद्दलची सविस्तर माहिती पोस्ट खात्याच्या अधिकृत appost.in/gdsonline या संकेत स्थळावर उपलब्ध आहे.

पगार किती :

  • पात्रतेत बसलात तर तुम्हाला 10,000 ते 14,500 पर्यंत पगार मिळू शकतो.  
  • 18 वर्ष ते 40 वर्षांच्या व्यक्ती या सर्व पदांसाठी अर्ज करू शकतात.  

WebTitle : jobs in indian post for five thousand candidates


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: jobs in indian post for five thousand candidates apply now