भारतीय लष्करामध्ये नवे अधिकारी दाखल

पीटीआय
रविवार, 9 डिसेंबर 2018

डेहराडून : भारतीय लष्करी अकादमीमध्ये (आयएमए) शनिवारी झालेल्या दीक्षान्त संचलनातून 427 अधिकारी (जंटलमन कॅडेट) लष्करात दाखल झाले. प्रशिक्षण संपविणाऱ्यांमध्ये भारताच्या सात मित्र देशांतील 80 छात्रांचाही समावेश आहे. चेटवूड ड्रिल स्क्वेअरमध्ये झालेल्या या संचलनाची सलामी लष्कराचे उपप्रमुख लेफ्टनंट जनरल देवराज अनबू यांनी स्वीकारली.

खडतर लष्करी प्रशिक्षण पूर्ण केल्याबद्दल छात्रांचे अभिनंदन करून लेफ्टनंट जनरल देवराज अनबू यांनी अकादमीतील त्यांच्या आठवणी जागविल्या. ते स्वतः या अकादमीचे छात्र आहेत. 
प्रशिक्षण पूर्ण करून लष्करात अधिकारी म्हणून दाखल होणाऱ्यांमध्ये उत्तर प्रदेशाचे सर्वाधिक; म्हणजे 53 अधिकारी असून, त्यापाठोपाठ हरियाना (51), बिहार (36), उत्तराखण्ड (26), दिल्ली (25) आणि महाराष्ट्र (20) यांचा क्रम आहे. भारताचे मित्र असलेल्या अफगाणिस्तान, भूतान, मालदीव, नेपाळ, श्रीलंका, ताजिकिस्तान आणि व्हिएतनाम या देशांच्या 80 छात्रांनीही आज प्रशिक्षण पूर्ण केले. 

Web Title: Joined New Officer in the Indian Army