'फेक न्यूज' देणाऱ्या पत्रकारांची मान्यता रद्द होणार

वृत्तसंस्था
मंगळवार, 3 एप्रिल 2018

नवी दिल्ली - केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या परिपत्रकात दिलेल्या माहितीनुसार, खोट्या बातम्या म्हणजे 'फेक न्यूज' देणाऱ्या पत्रकारांची मान्यता कायम स्वरूपी रद्द करण्यात येणार आहे. 

पत्ररात दिलेल्या माहितीनुसार, खोट्या बातम्या पसरविण्याचे प्रमाण बघता एखाद्या पत्रकाराने बातमी देण्याबाबत निकष कडक करण्यात आले आहेत. खोटी बातमी प्रसिद्द झाल्यास त्या पत्रकाराची मान्यता प्रथम सहा महिन्यांसाठी रद्द करण्यात येणार आहे. त्यानंतर अशी बातमी प्रसिद्ध झाल्यास वर्षभरासाठी मान्यता रद्द करण्यात येईल. त्यानंतर तिसऱ्यांदा असे करताना सापडल्यास कायमस्वरुपी त्या पत्रकाराती मान्यता रद्द करण्यात येईल.

याबाबतची चौकशी प्रेस काऊंसिल ऑफ इंडिया आणि न्यूज ब्रॉडकास्टर्स असोसिएशन यांच्याकडून होणार आहे. वृत्तपत्रांच्या संबंधित प्रकरणाची चौकशी ही पीसीआई आणि इलेक्ट्रॉनिक मीडियासाठी एनबीए चौकशी करणार आहे.

Web Title: Journalist accreditation could be permanently cancelled for fake news: Government

टॅग्स