#Karunanidhi एक पत्रकार, व्यंगचित्रकार आणि लेखक 'करुणानिधी'

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 7 ऑगस्ट 2018

साहित्यक्षेत्रातील बहुविध प्रकार हाताळणाऱ्या करुणानिधींनी थिरूकुरल यांच्या कुरलोवियमची संपादित आवृत्ती प्रसिद्ध केली. थोलक्काप्पिया पुंगा, पुंबूकर यांचे लेखन त्यांनी केले. तमिळ कला आणि शिल्पशास्त्र यांच्याबाबतही त्यांनी योगदान दिले. कन्याकुमारी येथे करुणानिधींनी थिरुवल्लूवर यांचा 133 फूट उंचीचा पुतळा उभारून थोर तमिळ विद्वानाविषयी कृतज्ञता व्यक्त केली आहे. 

 चेन्नई- साहित्यक्षेत्रातील बहुविध प्रकार हाताळणाऱ्या करुणानिधींनी थिरूकुरल यांच्या कुरलोवियमची संपादित आवृत्ती प्रसिद्ध केली. थोलक्काप्पिया पुंगा, पुंबूकर यांचे लेखन त्यांनी केले. तमिळ कला आणि शिल्पशास्त्र यांच्याबाबतही त्यांनी योगदान दिले. कन्याकुमारी येथे करुणानिधींनी थिरुवल्लूवर यांचा 133 फूट उंचीचा पुतळा उभारून थोर तमिळ विद्वानाविषयी कृतज्ञता व्यक्त केली आहे. 

वयाच्या विसाव्या वर्षी करुणानिधी यांनी ज्युपिटर पिक्‍चर्ससाठी पटकथा लेखन केले. त्यांच्या "राजाकुमारी' चित्रपटाने त्यांना मोठी लोकप्रियता मिळवून दिली. त्यांनी शालेयवयात सुरू केलेले "मुरसोली' सुरवातीला मासिक, नंतर साप्ताहिक आणि आता दैनिक स्वरुपात प्रसिद्ध होत आहे. आपल्यातील पत्रकार आणि व्यंगचित्रकार सतत जागा ठेवत ते ज्वलंत विषयांवर आपल्या पक्षाची तात्विक भुमिका जनतेसमोर ठेवत. गेली 50 वर्षे नियमीतपणे ते पक्षकार्यकर्त्यांना मार्गदर्शक असे लेखन करत होते. करुणानिधींनी याशिवाय, "कुडियारासू'चे संपादकत्व केले, "मुथाराम'ला जीवदान दिले आहे. सरकारी पत्रिका "तमिळ अरासू' सुरू होण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले, ते सध्या तमिळ आणि इंग्रजीत प्रसिद्ध होत आहे.

शंभरावर पुस्तकांचे लेखन 
करुणानिधी यांनी विपुल लेखन केले. त्यांची शंभरवर पुस्तके प्रकाशित झाली आहेत. यातील काही प्रमुख पुस्तके रोमापुरी पांडियन, थेंगापडी सिंघम, वेल्लीकिझामाई, नेंजुक्कू निधी, इनियावाई रुबाथू, संगा थामिझ, कुरलवियम, पोन्नार संकर, थिरुक्कुरल उरई अशी आहेत.

गेली 75 वर्षे करुणानिधी तमिळ चित्रपटांसाठी पटकथा आणि संवादलेखन केले. त्याद्वारे त्यांनी समाजात जनजागृतीचे कार्य केले. तिनशेवर चित्रपटांसाठी त्यांनी लेखन केले. त्यांनी लेखन केलेल्या काही चित्रपटांवर बंदीचे प्रयत्न झाले, काही चित्रपटांच्या कथानकावरून गदारोळ झाला. तरीही त्यांनी आपली लेखणी कायम सुरू ठेवली. याच लेखनाने करुणानिधींना सामान्य जनतेपर्यंत नेले; त्यांच्या नावाचे गारूड प्रेक्षकांबरोबरच सामान्यांवरही झाले. त्यांतून त्यांच्या "डीएमके'ची लोकप्रियता वाढत गेली. करुणानिधी राजकारणातील प्रगतीची शिडी चढत गेले. करुणानिधींनी कविता, कादंबऱ्या, कथा, पत्रे, नाटके, ऐतिहासिक कादंबऱ्या, चित्रपटांसाठी गिते असे बहुविध लेखन केले आहे याचा पाया होता तो करुणानिधींनी शाळेत असताना सुरू केलेले "मानवनेशन' हे हस्तलिखीत. तिरुवरूरच्या शाळेत असताना करुणानिधी हे हस्तलिखीत चालवायचे. 

त्याचबरोबर, करुणानिधी यांचे आत्मचरित्र सहा खंडात प्रसिद्ध झाले असून, त्याचे शीर्षक "नेंजुक्कू निथी' असे आहे. करुणानिधींना आण्णामलाई विद्यापिठाने 1971 मध्ये आणि 2006 मध्ये मदुराई कामराज विद्यापिठाने सन्माननीय पदवी प्रदान केलेली आहे.

Web Title: A journalist cartoonist and author karunanidhi