पत्रकार जे. डे. हत्याप्रकरणी छोटा राजनसह सर्व दोषींना जन्मठेप

वृत्तसंस्था
बुधवार, 2 मे 2018

पत्रकार जे. डे. हत्याप्रकरणातील दोषी छोटा राजनसह नऊ दोषींना जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली. यातील दोषींना मुंबईतील विशेष मोक्को न्यायालयात शिक्षा सुनावण्यात आली.   

मुंबई : पत्रकार जे. डे. हत्याप्रकरणातील दोषी छोटा राजनसह नऊ दोषींना जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली. यातील दोषींना मुंबईतील विशेष मोक्को न्यायालयात शिक्षा सुनावण्यात आली.  

J Day journalist

पत्रकार जे. डे. हत्याप्रकरणी संघटित गुन्हेगारी टोळीचा म्होरक्या छोटा राजनला दोषी ठरविण्यात आले आहे. पत्रकार जिग्ना वोरा आणि पॉल्सन जोसेफची निर्दोष सुटका करण्यात आली आहे. सबळ पुराव्यांअभावी त्यांची सुटका करण्यात आली. मुंबईतील विशेष मोक्का न्यायालयाने हा निर्णय दिला आहे. तसेच छोटा राजन, सतीश काल्या, अभिजीत शिंदे, अरुण डाके, सचिन गायकवाड, अनिल वाघमोडे, निलेश शेंडगे, मंगेश अगनावे, विनोद असरानी आणि दीपक सिसोडीया या 9 जणांवर दोष सिद्ध झाले. या सर्वांना आता जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. 

पत्रकार जे. डे. यांची 7 वर्षांपूर्वी पवई येथील निवासस्थानी जात असताना हत्या करण्यात आली होती. त्यांच्यावर केलेल्या गोळीबारात पाच गोळ्या लागल्याने गंभीर जखमी अवस्थेत त्यांना हिरानंदानी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे जे. डे. यांनी अखेरचा श्वास घेतला होता. 
 

Web Title: Journalist J Day Murder Case Chhota Rajan for life imprisonment