पत्रकाराच्या आत्महत्येप्रकरणी माजी आमदारास तुरुंगवास

वृत्तसंस्था
शुक्रवार, 3 मार्च 2017

अंबाला: पत्रकारास आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी कॉंग्रेसचे माजी आमदार रामकिशन गुजर आणि अन्य दोन जणांना आज येथील स्थानिक न्यायालयाने तुरुंगवासाची शिक्षा सुनावली.

अतिरिक्त सत्र न्यायाधीश संजीव आर्य यांनी या प्रकरणातील आरोपी गुजर आणि सहआरोपी विजय आणि अजित यांना प्रत्येकी दहा हजार रुपयांचा दंड ठोठाविला. त्याशिवाय मृत पत्रकाराच्या नातेवाइकांना पाच लाख रुपयांची नुकसानभरपाई देण्याचे आदेश दिले. नारायणगड येथील पत्रकार पंकज खन्ना यांनी 10 जून 2009 रोजी आत्महत्या केली होती.

आत्महत्येपूर्वी खन्ना याने लिहिलेल्या चिठ्ठीत म्हटले होते की, गुजर आणि त्याच्या दोन साथीदारांनी आपल्याला त्रास दिला होता आणि पोलिसांनीही त्यांच्या सांगण्यावरून आपल्याविरुद्ध खोटी तक्रार दाखल केली होती. पंकज खन्ना यांच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी गुजर आणि अन्य दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. चौकशीनंतर संसदेच्या माजी मुख्य सचिवांनी गुजर याला निर्दोष ठरविले होते.

Web Title: Journalist murder case, former legislator in jail