योगींविरोधात आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने पत्रकाराला अटक

वृत्तसंस्था
रविवार, 9 जून 2019

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची प्रतिम मलीन केल्याप्रकरणी लखनौमध्ये गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी कारवाई करत प्रशांत यांना ताब्यात घेतले. एका महिलेने योगींना लग्नाचा प्रस्ताव दिल्याबद्दलचा व्हिडिओ प्रशांत यांनी ट्विटर आणि फेसबुकवर अपलोड केला होता.

लखनौ : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याविरोधात सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने पत्रकार प्रशांत कानोजिया यांना अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, योगी आदित्यनाथ यांच्याविरोधात आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याप्रकरणी दिल्लीस्थित पत्रकार प्रशांत कनोजिया यांना अटक करण्यात आली. तसेच नोएडातील एका खासगी वृत्तवाहिनीच्या प्रमुखालाही अटक करण्यात आली आहे. यांनीही आदित्यनाथ यांचा अवमान होईल असे वृत्त प्रसारित केले होते. 

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची प्रतिम मलीन केल्याप्रकरणी लखनौमध्ये गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी कारवाई करत प्रशांत यांना ताब्यात घेतले. एका महिलेने योगींना लग्नाचा प्रस्ताव दिल्याबद्दलचा व्हिडिओ प्रशांत यांनी ट्विटर आणि फेसबुकवर अपलोड केला होता. दिल्लीतील विनोद नगर येथून शनिवारी रात्री त्यांना ताब्यात घेण्यात आले. आज लखनौमधील न्यायालयात हजर करण्यात येईल. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Journalist TV Channel Head Arrested Over Content On Yogi Adityanath