कुटुंबाला संपवून पत्रकाराची आत्महत्या 

वृत्तसंस्था
शुक्रवार, 22 जून 2018

सिद्दीपेट जिल्ह्यातील भरत नगर भागामध्ये राहणाऱ्या एका पत्रकाराने दोन मुले आणि पत्नीचा खून करून स्वत: आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. हनुमंता राव असे या पत्रकाराचे नाव आहे, या घटनेत दोन्ही मुले मरण पावली असून, राव यांची पत्नी मात्र गंभीर जखमी झाली आहे.

हैदराबाद : सिद्दीपेट जिल्ह्यातील भरत नगर भागामध्ये राहणाऱ्या एका पत्रकाराने दोन मुले आणि पत्नीचा खून करून स्वत: आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. हनुमंता राव असे या पत्रकाराचे नाव आहे, या घटनेत दोन्ही मुले मरण पावली असून, राव यांची पत्नी मात्र गंभीर जखमी झाली आहे.

सध्या त्यांच्यावर येथील रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. हनुमंता राव आंध्र भूमी या तेलुगू दैनिकामध्ये काम करत होते. आर्थिक समस्या आणि सहकाऱ्यांच्या त्रासाला कंटाळून त्यांनी हे पाऊल उचलल्याचे समजते. या प्रकरणी पोलिसांनी त्यांच्या दोन्ही सहकाऱ्यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. 

Web Title: Journalist's suicide with family

टॅग्स