JRD TaTa : कंपनीचे मालक असूनही जेआरडींनी एअर इंडिया विमानाचं संडास साफ केलं होतं! | JRD Tata Inspirational Story | Tata Success Story | Latest Marathi News | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

JRD Tata

JRD Tata Story: कंपनीचे मालक असूनही जेआरडींनी एअर इंडिया विमानाचं संडास साफ केलं होतं!

JRD Tata Inspirational Story: जहांगीर रतनजी दादाभाई टाटा यांना जेआरडी टाटा म्हणूनही ओळखले जाते. भारताचे पहिले परवानाधारक पायलट आणि देशातील पहिल्या व्यावसायिक विमान कंपनीचे संस्थापक, उद्योगपती अनेक दशके टाटा समूहाचे संचालक होते.

त्यांनी भारतात पोलाद, अभियांत्रिकी, हॉटेल, विमान आणि इतर उद्योग विकसित केले. त्यांना 1957 मध्ये पद्मविभूषण आणि 1992 मध्ये भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

आजच्याच दिवशी जेआरडींना भारतरत्न या सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. त्यांनी एअर इंडियासाठी घेतलेले परिश्रमच त्यांच्या यशाची गुरूकिल्ली होती.  

इंग्लिश खाडी विमानाद्वारे पहिल्यांदा पार करणारे सुप्रसिद्ध फ्रेंच वैमानिक लुईस ब्लेरिअट यांच्या जीवनकार्याने जेआरडी खूप प्रभावित झाले होते. त्यामुळे त्यांनीही विमान शिकण्याचा ध्यास घेतला. १९२९ मध्ये त्यांनी वैमानिकाचा परवाना मिळवला.

वैमानिकाचा परवाना मिळवणारे ते पहिले भारतीय ठरले. १९३२ मध्ये त्यांनी टाटा एरलाईन्स या पहिल्या भारतीय प्रवासी विमानवाहतूक कंपनीची स्थापना केली. पुढे १९४६ मध्ये तिचे नाव बदलून एर इंडिया ठेवले गेले.

JRD Tata Inspirational Story

JRD Tata Inspirational Story

एक वेळ अशी होती की, एअर इंडियाच्या विमानाचं संडासचं भांड जेआरडींनी स्वत: साफ केलं होतं. पण त्यांनी असं का केलं, या बद्दलच आज जाणून घेऊयात.

टाटांनी एअर इंडियात विमानांकडे केवळ एक मशीन म्हणून पाहिले नव्हते. तर, त्यांना आपल्या घरातील सदस्यांप्रमाणेच सजवले होते. घरातील वस्तूंचे रंग, त्यांची भव्यता जशी असते. तशीच ते विमानात सजावट करायचे.

विमानातील स्वच्छतेकडे जातीने लक्ष द्यायचे. तसेच, ते वेळ मिळेल तेव्हा स्वत: विमान स्वच्छ करायचे. अशाच एका व्हिजिटवेळी त्यांनी संडासंचं भांड अस्वच्छ दिसलं. तर, कोणताही विचार न करता त्यांनी हाताच्या बाह्यांनी ते पुसून घेतलं.

तर, एका प्रसंगी टेबलनर साचलेली धूळ पुसण्यासाठी त्यांनी सेवकाकडून डस्टर मागवलं आणि स्वत:च टेबल साफ केला.  जेआरडींसाठी ही काही नवं नव्हतं. त्यांनी जे काही काम केलं ते आपलं म्हणूनच केलं म्हणूनच एअर इंडियासोबतच इतरही समुह मोठे झाले.

JRD Tata Inspirational Story

JRD Tata Inspirational Story

टाटा उद्योगसमूहातील अनेक नव्या उद्योगांचा पाया ‘जेआरडीं’नी घातला. यामध्ये टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, टाटा मोटर्स, टायटन इंडस्ट्रीज, टाटा टी, व्होल्टास आणि देशातील पहिली विमान कंपनी एअर इंडिया यांचा समावेश आहे. फ्रान्स, लंडन, जपान आणि भारतात त्यांचे शिक्षण झाले. १९२५ मध्ये त्यांनी ‘टाटा सन्स’मध्ये बिनपगारी अॅप्रेंटिस म्हणून आपली कारकीर्द सुरू केली.

१९३८मध्ये वयाच्या ३४व्या वर्षी ते ‘टाटा सन्स’चे अध्यक्ष बनले होते. स्टील, रसायने, ऊर्जा, वीज, अभियांत्रिकी आणि आतिथ्यशीलता या क्षेत्रात त्यांना अधिक रस होता. त्यामुळे या क्षेत्रातील अनेक उद्योगांचा पाया त्यांनी घातला.

देशाच्या प्रगतीतील त्यांचे योगदान लक्षात घेऊन भारत सरकारने त्यांना ‘भारतरत्न’ या सर्वोच्च मानाच्या नागरी पुरस्काराने १९९२ मध्ये त्यांना सन्मानित केले होते. अशा या महान उद्योजकाने ८९ व्या वर्षी २९ नोव्हेंबर १९९३ रोजी जीनिव्हामध्ये अखेरचा श्वास घेतला.