न्यायाधीश आणि मुलाने चपाती खाल्ली अन्....

वृत्तसंस्था | Thursday, 30 July 2020

न्यायाधीश आणि त्यांच्या मुलाने चपाती खाल्यानंतर त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी एका महिला आणि मांत्रिकासह सहा जणांना अटक करण्यात आली आहे.

भोपाळ (मध्य प्रदेश): न्यायाधीश आणि त्यांच्या मुलाने चपाती खाल्यानंतर त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी एका महिला आणि मांत्रिकासह सहा जणांना अटक करण्यात आली आहे. जिल्हा अतिरिक्त व सत्र न्यायाधीश महेंद्र त्रिपाठी आणि त्यांच्या ३३ वर्षीय मुलाचा दोन दिवसांपूर्वी मृत्यू झाला. जेवणानंतर त्यांना अस्वस्थ दोन वाटू लागले होते. अखेर दोन दिवसांनी त्यांचा मृत्यू झाला होता.

पोलिसांनी याप्रकरणी स्वयंसेवी संस्था चालवणाऱ्या संध्या सिंह नावाच्या महिलेला अटक केली आहे. संध्या सिंह हिनेच न्यायाधीशांच्या कुटुंबाला विषारी पीठ दिले होते. त्यांच्या घरात एकोपा राहावा यासाठी आपण पूजा केल्यानंतर हे पीठ दिल्याचा तिचा दावा आहे.

मणिपूरमध्ये दहशतवाद्यांचा हल्ला; तीन जवान हुतात्मा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, न्यायाधीशांनी २० जुलै रोजी घरी पीठ आणले होते. त्यांच्या कुटुंबाने त्याच दिवशी जेवणासाठी त्या पीठाच्या चपात्या केल्या होत्या. पण, न्यायाधीश आणि त्यांच्या मुलानेच चपात्या खाल्ल्या होत्या. पत्नीने फक्त भात खाल्ला होता. जेवण झाल्यानंतर काही वेळातच न्यायाधीश आणि त्यांच्या मुलाला उलट्या होऊ लागल्या. २३ जुलै रोजी त्यांची प्रकृती अजून खालावली होती. २५ जुलै रोजी उपचारासाठी दोघांनाही नागपूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान पहिल्या दिवशी मुलाचा आणि दुसऱ्या दिवशी न्यायाधीशांचा मृत्यू झाला. न्यायाधीशांचा लहान मुलगाही चपाती खाल्लायनंतर आजारी पडला होता, पण आता त्याची प्रकृती स्थिर आहे.

कोरोनापासून बचाव होण्यासाठी बनवले फुग्यांचे कवच...

संध्या सिंह आणि तिच्या चालकाला अटक करण्यात आली. दोघांची चौकशी केल्यानंतर पुन्हा तिघांना अटक करण्यात आली. महिलेला सल्ला देणाऱ्या मांत्रिकाने पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. याबाबतचा पुढील तपास सुरू आहे.