'जुमलां'नी शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढणार नाही : मनमोहनसिंग

वृत्तसंस्था
रविवार, 22 जुलै 2018

पंतप्रधान मोदी यांचे लक्ष्य जुमला वाढविणे आहे. 2022 पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचा दावा करणाऱ्या कृषिक्षेत्रात वर्षाला 14 टक्क्यांचा विकासदर पाहिजे. मात्र, हा विकासदर आसपासही गेल्याचे दिसत नाही.

- डॉ. मनमोहनसिंग, माजी पंतप्रधान

नवी दिल्ली : शेतकऱ्यांच्या आर्थिक परिस्थितीबाबत माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी भाष्य केले. शेतकऱ्यांची सध्याची परिस्थितीवर मनमोहनसिंग यांनी मोदी सरकारवर टीकास्त्र सोडले. ते म्हणाले, फक्त जुमल्यांमुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट होऊ शकत नाही.

काँग्रेस कार्यकारी समितीची बैठक आज (रविवार) दिल्ली येथे होत आहे. त्यादरम्यान मनमोहनसिंग यांनी विविध मुद्यांवर मोदी सरकारवर निशाणा साधला. ते म्हणाले, पंतप्रधान मोदी यांचे लक्ष्य जुमला वाढविणे आहे. 2022 पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचा दावा करणाऱ्या कृषिक्षेत्रात वर्षाला 14 टक्क्यांचा विकासदर पाहिजे. मात्र, हा विकासदर आसपासही गेल्याचे दिसत नाही.

विकासाचा वेग वाढविण्यासाठी पंतप्रधान मोदी आपल्या प्रशंसांचा पूल बांधण्यासाठी तयारीला लागले आहेत. मात्र, अशाप्रकारे जुमलांची भाषा केल्याने काहीही होणार नाही. देशाला काहीतरी करून दाखवायला हवे, असेही ते म्हणाले. 

Web Title: Jumala will not increase the income of farmers says Manmohan Singh